Tea : कुठे शेणाचा तर कुठे टोमॅटोचा, वाचा जगातील सर्वात विचित्र चहा
भारतात चहाचे शौकीन असणाऱ्या लोकांची काही कमी नाही.. एक चहा प्रेमी व्यक्ती फक्कड चहाच्या शोधात अगदी दूर-दूर पर्यंत जाऊ शकते. चहा विविध प्रकारे बनवला जातो. कोरा, दुधाचा हल्ली तर ग्रीन, ब्लू असे आरोग्यदायी चहा जास्तीच ट्रेंडमध्ये आहेत. पण तुम्ही कधी शेण, टोमॅटो आणि याक प्राण्याच्या दुधापासून बनवलेल्या चहाबद्दल ऐकले आहे का? ऐकून विचित्र वाटेल पण हे खरं आहे. चला जाणून घेऊयात हे चहा कुठे बनतात.
शेणाचा चहा –
अरुणाचल प्रदेशात हा वेगळा चहा बनवला जातो. या चहाला ‘पंगा गोबर चहा’ असे म्हणतात. हा चहा बनवण्यासाठी चहाची पाने पाण्यात आणि म्हशीच्या शेणात शिजवली जातात. असे म्हणतात की, या पद्धतीने चहा बनवल्याने चहात अनेक औषधी गुणधर्म उतरतात.
याक बटरचा चहा –
तिबेट आणि नेपाळच्या डोंगराळ भागात आंबवलेल्या याक बटरचा वापर करून चहा बनवला जातो. हा चहा येथील पारंपरिक पेय असून त्याला ‘पोचा’ किंवा ‘बटर टी’ असे म्हणतात. हा चहा बनवण्यासाठी याकच्या दुधापासून बनवलेले लोणी, मीठ आणि चहाची पाने वापरली जातात.
हेही वाचा – Husband Wife Similarity: लग्नानंतर जोडपी एकसारखी का दिसू लागतात? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
विष्ठेपासून चहा –
इंडोनेशियामध्ये देखील अनोखा चहा बनवला जातो. या चहाला बग ‘पोपटी कोपिलवाक’ आणि ‘सिवेट कॉफी’ असे म्हटले जाते. हा चहा सिवेट या मांजरीच्या विष्ठेपासून बनवला जातो. मांजरीला कॉफी बीन्स खायला दिले जातात आणि तिच्या विष्ठेतून या बीन्स गोळा करून त्या वाळवल्या जातात. यानंतर त्या बारीक करून त्याचा वापर केला जातो. ही कॉफी असली तरी येथील नागरिक हे पेय चहा म्हणून सेवन करतात.
टोमॅटोचा चहा –
टोमॅटोचा चहा मोरक्कोमध्ये बनवला जातो. या देशात टोमॅटो, पुदिना यांपासून चहा बनवला जातो. टोमॅटो हे मोरक्को येथे जास्त प्रमाणात खाल्ले जाते त्यामुळे इथल्या चहामध्ये त्याचा वापर केला जातो.
हेही वाचा – Gen Z Workplace Problems: ऑफिसमध्ये टिकत नाहीय Gen Z? तरुण कर्मचाऱ्यांना का लवकर काढत आहेत कंपन्या
Comments are closed.