स्वदेशी आत्मघाती ड्रोनच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे

एनएएलची खासगी कंपनीसोबत भागीदारी : 900 किमीचा असणार मारकपल्ला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताला स्वदेशी इंजिनने संचालित होणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या ड्रोन्सची एक सीरिज मिळणार आहे. यामुळे विदेशी पुरवठादारांवरील निर्भरता संपुष्टात येणार आहे. नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीजने (एनएएल) एका खासगी कंपनीसोबत मिळून दीर्घ पल्ल्याचा ड्रोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. एनएएलचे हे ड्रोन स्वदेशी इंजिनने युक्त असतील. भारतासाठी ही मोठी कामगिरी ठरणार आहे, कारण आतापर्यंत ड्रोन्सच्या इंजिन्ससाठी भारतीय कंपन्या विदेशी कंपन्यांवर निर्भर होत्या.

एनएएलने पहिल्यांदाच खासगी कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. एनएएलच्या ‘वैंकेल’ इंजिनचा वापर करत दीर्घ पल्ल्याचे आत्मघाती ड्रोन आणि क्षेपणास्त्रs निर्माण करण्यात येणार आहे. या आत्मघाती ड्रोन्सचा मारकपल्ला 900 किलोमीटरपेक्षा अधिक असणार आहे. अशाप्रकारे नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज स्वत:कडून विकसित ‘वैंकेल’ इंजिनचा वापर करत दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची नवी साखळी तयार करणार आहे.

900 किमीवरून शत्रूवर वार

ही क्षेपणास्त्रs 900 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील स्वत:च्या लक्ष्याचा शोध घेत त्यांना नष्ट करणार आहेत. एनएएल ही कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्टियल रिसर्चचा (सीआयएसआर) हिस्सा आहे. एनएएल प्रारंभी स्वत:च्या 30 एचपी वैंकेल इंजिनच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणार आहे. या इंजिनद्वारे 9 तासांपर्यंत उ•ाण करू शकणारे आणि 900 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत लक्ष्याचा भेद करू शकणारे कामिकेज ड्रोन्स तयार करण्यात येणार आहे.

150 किलो वजनी क्षेपणास्त्राची योजना

या प्रकल्पात 150 किलोग्रॅम वजनाचे एक क्षेपणास्त्र विकसित करण्यात येईल. या 30 एचपी इंजिनला विमानात जोडणे आणि उ•ाण परीक्षणासाठी सीईएमआयएलएसीची आवश्यक मंजुरी मिळाली आहे. 50एचपीचे इंजिनही तयार होत असून त्याचे प्रमाणन व परीक्षण लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.  यानंतर 90 एचपीचे इंजिन येईल, जे आणखी अवजड युएव्हीजना उ•ाणक्षमता मिळवून देणार आहे. एनएएलने या प्रकल्पासाठी सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडला स्वत:चा भागीदार म्हणून निवडले आहे.

एसडीएएलसोबत भागीदारी

या कराराच्या अंतर्गत एनएएल तंत्रज्ञान हस्तांतरण करेल आणि क्षेपणास्त्रांच्या विकासात एसडीएएलसोबत मिळून काम करणार आहे. एसडीएएल देशविदेशात या क्षेपणास्त्रांची निर्मिती तसेच मार्केटिंगची जबाबदारी सांभाळेल. 150 किलोग्रॅम या क्षेपणास्त्राचे नाव ‘लोइटरिंग म्युनिशन युएव्ही’ ठेवण्यात आले आहे. याचा मारक पल्ला 900 किलोमीटर असेल आणि हे सलग 9 तासांपर्यंत आकाशात राहू शकणार आहे.

शत्रूच्या रडारला चकवा

रडारवर सहजपणे दिसणार नाही अशाप्रकारे ड्रोनला डिझाइन करण्यात येणार आहे. जीपीएस सिग्नल न मिळणाऱ्या ठिकाणीही हा ड्रोन उपयुक्त ठरणार आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने युक्त एक पेलोड असेल, जो प्रत्यक्षवेळेत शत्रूची ओळख पटविणे आणि त्याची माहिती मिळविण्यास मदत करणार आहे. यामुळे युद्धभूमीची स्थिती समजून घेणे सोपे ठरणार आहे. ही भागीदारी भारताला ड्रोन तंत्रज्ञानात आत्मनिर्भर करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.

 

 

Comments are closed.