Maharashtra Local Bodies Election LIVE Update : राज्यातल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला, नागपूर खंडपीठाचा निर्णय

बीडमध्ये लक्ष्मीदर्शन… अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; धारदार शस्त्रही जप्त pic.twitter.com/wIlgBKKpcH
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 2 डिसेंबर 2025
- सर्व मोतमोजणी 21 डिसेंबरला होणार, नागपूर खंडपीठाचा निर्णय
- राज्यात अनेक ठिकाणी नगरपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण या निवडणुकांची मतमोजणी उद्या नव्हे तर 21 डिसेंबर रोजी सर्व नगरपंचायत, पंचायत समितीच्या मतमोजणीसोबत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासाठी आज मतदान पार पडत आहे. बदलापुरात वडवली सेक्शन मध्ये मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
- बदलापूरमध्ये भरारी पथकाने दोन लाखांची रोकड पकडली, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूबदलापूरमध्ये भरारी पथकाने दोन लाखांची रोकड पकडली, सुरवळ चौकातला प्रकारबदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुदोन लाखांच्या रकमेसह एका इसमाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
- बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिका निवडणुकीत सकाळच्या टप्प्यात संथ गतीने मतदान, सरासरी सकाळी दोन तासात केवळ आठ टक्के मतदान
एकनाथ शिंदेंनी मालवणात आणल्या पैशांच्या बॅगा; निलेश राणेंकडूनही पैशांचे वाटप, वैभव नाईक यांनी शेअर केला व्हिडीओ pic.twitter.com/lYHoKg60N1
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 2 डिसेंबर 2025
- पालघर 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी.
- डहाणू नगरपरिषद _ 8.72% मतदान
- जव्हार नगरपरिषद _7.19% मतदान
- पालघर नगरपरिषद _ 8.75% मतदान
- वाडा नगरपंचायत _6.71% मतदान
शिंदे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग, नियमांची पायमल्ली करत महिला मतदाराला कुठलं बटण दाबायचं ते दाखवलं pic.twitter.com/hZUQ0yKUle
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 2 डिसेंबर 2025
- खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 15 मधील व्होटिंग मशीन 2 तास बंद, 7.30 ते 9.30 वाजे पर्यंत मतदानाची एकूण टक्केवारी 8.36%
- बदलापूर गांधीनगर परिसरात सकाळी भाजप आणि शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली
या परिसरातील मतदारांना मतदान करून दिले जात नाही असा आरोप भाजप च्या कार्यकर्त्यांनी केला तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपवाले धनलक्ष्मी वाटप असल्याने आम्ही त्यांना विरोध केला असल्याचे सांगितले. - महाड नगरपालिका निवडणूक – सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 11.06% मतदान
- बदलापूर पूर्व शिरगाव भागातील मतदार केंद्रातील गुरुकुल शाळेतील तीन नंबरची मशीन सकाळपासून सुमारे पाऊण तास बंद होती, त्यामुळे मतदार मतदान न करताच निघून गेले.
- बदलापूर पश्चिम येथील बस डेपो परिसरात शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, शिवीगाळ आणि हाणामारी, मतदान केंद्रात जाण्यावरून वाद झाला.
- माथेरान नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना आज सकाळी पाच लाख रुपयांची कॅश पकडण्यात आली आहे… कॅश घेऊन जाणाऱ्या तरुणाची चौकशी सुरू

Comments are closed.