फॅफ आणि रसेलनंतर आणखी एक धक्का! या स्टार खेळाडूनेही आयपीएल 2026ला केला रामराम, मोठं कारण उघड

ऑस्ट्रेलियन क्रिकेट दिग्गज ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2026च्या मिनी लिलावात सहभागी होणार नाही. त्याने आज मंगळवारी याची पुष्टी केली. 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या मिनी लिलावातून माघार घेणारा तो आंद्रे रसेल आणि फाफ डू प्लेसिसनंतर तिसरा मोठा खेळाडू आहे. फाफ आता आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे. अष्टपैलू मोईन खान देखील पीएसएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे आपला निर्णय जाहीर केला. तो 37 वर्षांचा आहे आणि बराच विचारविनिमय केल्यानंतर त्याने लिलावात भाग न घेण्याचा निर्णय घेतल्याने तो आता आयपीएलला निरोप देत आहे.

त्याने लिहिले, “आयपीएलमधील अनेक अविस्मरणीय हंगामांनंतर, मी या वर्षी लिलावात माझे नाव न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा निर्णय आहे. या लीगने मला जे काही दिले आहे त्याबद्दल मी आभारी आहे.”

त्याने पुढे लिहिले, “आयपीएलने मला क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून घडवण्यास मदत केली आहे.” मी भाग्यवान आहे की मी जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळलो, एका उत्तम फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व केले आणि चाहत्यांसमोर अविश्वसनीय उत्साहाने कामगिरी केली. भारताच्या आठवणी, आव्हाने आणि ऊर्जा नेहमीच माझ्यासोबत राहतील. गेल्या काही वर्षात तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. लवकरच भेटण्याची आशा आहे. चिअर्स, मॅक्सी.

त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सवेलला शेवटचा पंजाब किंग्जने 4.2 कोटींना विकत घेतले होते. हा स्टार अष्टपैलू खेळाडू आयपीएल 2025 मध्ये 7 सामने खेळला होता पण त्याच्या प्रतिष्ठेनुसार कामगिरी करू शकला नाही. गेल्या हंगामात तो फक्त 48 धावा करू शकला आणि फक्त 4 विकेट्स घेतल्या. त्याने आयपीएलमध्ये एकूण 141 सामने खेळले आहेत.

Comments are closed.