रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत, तर बदलापूरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात राडा


महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक: रायगडच्या राजकीय वर्तुळातुनाही मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत्यामुळे तुफान राडा झाला आहे. यात वाहनांचीहे मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये हि मोठी हाणामारी झाली आहे. यात सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान महाडमध्ये मोठी दंगल होऊन आता राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महाडमधील नवे नगर परिसरात हि हाणामारी झाली आहे. या राड्यात सुशांत जाबरे याला बेदम मारहाण करण्यात आली असून सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आली आहे.

सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सुशांत जाबरे हे महाड मधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता राडा झाला. विकास गोगावले यांच्या समर्थकांना रिवाल्वर दाखवल्यामुळे सुशांत साबळेंच्या समर्थकांना चोप देण्यात आल्याचे बोललं जात आहे.

Badlapur: बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तुफान राडा

दुसरीकडे बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर मध्ये देखील दोन गटात राडा झाल्याची माहिती आहे. महायुतीतील मित्र पार्टी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात हा तुफान राडा झाला आहे. भाजप उमेदवार रमेश सोळसे त्यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर हा राडा झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत लाठी चार्ज करत गर्दी पांगवली आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उभा असताना मुलाला मारहाण करत असल्याचा जाब विचारल्याने हा राडा झाल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निशा ठाकरे या ठिकाणी भाजप उमेदवार विरुद्ध निवडणूक लढत आहे. सध्या या परिसरात तणावाचा वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चिपळूणमध्ये बूथ लावण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद

तर दुसरीकडे चिपळूणमध्ये देखील असाच एक राडा झाल्याचे बघायला मिळालंहे. बूथ लावण्यावरून चिपळूणच्या गोवळकोट परिसरात दोन गटात जोरदार बाचाबाची झालीय. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहे. 100 मीटरच्या आत बूथ लावल्याच्या कारणावरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन गटात शाब्दिक चकमक होऊन वाद झाल्याची माहिती आहे. परिणामी कार्यक्रमस्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा गोवळकोट येथे दाखल झाला आहे. निवडणूक अधिकारी विशाल भोसले ही घटनास्थळी दाखल झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवाराने 100 मीटरच्या आत बुथ लावल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. त्यावरूनf आणि हा वाद विकोपाला गेल्याची माहिती आहे.

मुक्ताईनगरमध्ये दोन कट्टर विरोधक मतदान केंद्रावर आमने-सामने

तर तिकडे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये दोन कट्टर विरोधक मतदान केंद्रावर आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे मतदारांच्या भेटीगाठी घेताना वाहने समोरासमोर-सामने आल्याने गोंधळाचं वातावरण बांधकाम झालं. यावर बोलतानाहीएकनाथ खडसे म्हणाले तेआमदार मला ओव्हरटेक करून पुढे गले. गुंडगिरी आमदारांची वाढलीहे. तर एकनाथ खडसेंना माझी हवा सहन होत नाही. ओव्हरटेक करणं हा काय कायद्याचा भंग आहे का? गावात राहणं बंद करायचं का? खडसे स्वतः रस्ता अडवताय, गुंडगिरी तेच करताय. मी एक गरीब माणूस आहे. अशी अभिप्राय आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावर दिली आहे.

हे हि वाचा

आणखी वाचा

Comments are closed.