महाडमध्ये गोगावले Vs सुशांत जाबरे समर्थकांमध्ये धुमश्चक्री, गाड्यांच्या काचा फुटल्या रिव्हॉल्व्
रायगड नगरपरिषद शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी राडा : रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेसाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळी गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सुशांत जाबरे (Sushant Jabre) आणि त्यांच्या अंगरक्षकाला भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले (Vikash Gogawale) यांच्या समर्थकांनी जबर मारहाण केल्याची माहिती आहे. विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे (Sushant Jabre) यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे सध्या महाडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या महाड पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. (Maharashtra Politics news)
प्राथमिक माहितीनुसार, महाडच्या नवे नगर परिसर ही हाणामारी झाली. सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज सकाळपासून महाड नगरपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्र बंद पडली होती. त्यामुळे गोगावले आणि जाबरे यांच्या समर्थक एका मतदान केंद्रांवर जमले होते. यावेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन तुफान हाणामारी सुरु झाली. गोगावेल समर्थकांनी दगडफेक करुन सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे हा वाद चिघळला. विकास गोगावले हे रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, हे बघावे लागेल.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्रीपदावरुन भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरु आहेत. याच वादातून दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. गेल्या काही काळामध्ये तटकरे आणि गोगावले या दोघांनीही एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडले आहेत. त्यामुळे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वैर आणखीनच वाढले आहे. याचा उद्रेक मंगळवारी मतदानावेळी पाहायला मिळाला. या वादानंतर सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीमध्ये शांतता राखणे आपले कर्तव्य ठरते. सकाळपासून युवा नेते म्हणवारे मतदान केंद्रात जात आहेत, आरओशी हुज्जत घालतात. मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधीला असतो. मात्र, विकास गोगावले मतदान केंद्रांमध्ये आत जात आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
आणखी वाचा
Comments are closed.