बुलढाण्यात पकडले 2 बोगस मतदार! ग्रामीण भागातून 2 गाड्या भरून बोगस मतदार आणल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना सुरूवात झाली आहे. मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार आहे. यावेळी राज्यातील अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड होऊन मशीन बंद पडल्याच्या बातम्या समोर आल्या. अशातच बुलढाण्यात 2 बोगस मतदार पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बुलढाणा नगर पालिका निवडणूकीसाठी 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान होत असल्याचे उघड झाले आहे. प्रभाग क्रमांक 15 येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता.मोताळा येथील एका व्यक्तीने मतदान केल्यानंतर त्याला पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण असल्याची माहिती आहे.

बुलढाण्यात मिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ग्रामीण भागातून लोकांना आणून नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदान करून घेत असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या हवाले करत असताना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड याने पोलिसाला शिवीगाळ आणि दमदाटी करून बोगस मतदाराला पळवून लावल्य़ाचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या प्रकरणी कुणाल गायकवाड याच्याविरोधात बोगस मतदार आणल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आपल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

बुलढाण्यात दोन गाड्या भरून बोगस मतदार

कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आले आहेत. दरम्यान ग्रामीण भागातून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Maharashtra Local Bodies Election LIVE Update : राज्यातल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला, नागपूर खंडपीठाचा निर्णय

Comments are closed.