फाफ डुप्लेसी-रसेल नंतर ग्लेन मॅक्सवेल देखील IPL 2026 मध्ये खेळणार नाही? मेगा लिलावापूर्वी घेतला हा मोठा निर्णय!
ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) आयपीएल 2026 च्या लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. गेल्या काही दिवसांत मॅक्सवेल हा असा दुसरा मोठा खेळाडू आहेत, ज्याने लिलावातून नाव काढून घेतले आहे. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिस (Faf du plessis) यानेही अशीच घोषणा केली होती. तसेच केकेआरकडून रिलीज झाल्यानंतर आंद्रे रसेलनेही निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे तोही लिलावात दिसणार नाही.
मॅक्सवेलने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, तो या मिनी ऑक्शनचा भाग असणार नाही. मागील दोन हंगामांत त्याने मिळून फक्त 100 धावा केल्या आणि गोलंदाजीत 10 विकेट्स घेतल्या.
मॅक्सवेलने भावूक होत लिहिले:
आयपीएलमध्ये अनेक अविस्मरणीय हंगाम घालवल्यानंतर मी यंदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय आहे. या लीगचा मी सदैव आभारी राहीन. IPL ने मला खेळाडू म्हणून आणि वैयक्तिक आयुष्यातही खूप काही दिले.
जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा, वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करण्याचा आणि उत्साही भारतीय चाहत्यांसमोर खेळण्याचा मला मोठा सन्मान मिळाला. त्या आठवणी, त्या आव्हानांचे क्षण आणि भारतातील लोकांचा क्रिकेटप्रेम माझ्यासोबत कायम राहील. इतक्या वर्षांपासून मला दिलेल्या पाठिंब्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार. आशा आहे, पुन्हा भेटू.
आयपीएल 2025 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पंजाब किंग्सकडून खेळला होता. मेगा ऑक्शनमध्ये पंजाबने त्याला 4.2 कोटींना खरेदी केले होते. पण मागील हंगामात त्याने 7 सामन्यांत मिळून फक्त 48 धावा केल्या आणि गोलंदाजीत 4 विकेट्स घेतल्या.
याआधी फाफ डू प्लेसिसने आयपीएल लिलावात सहभागी न होण्याची पुष्टी केली असून, तो आता PSL 2026 मध्ये खेळणार आहे. तसेच आंद्रे रसेलनेही आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Comments are closed.