सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल,चांदी 2 लाखांचा टप्पा पार करणार? आजचे सोन्याचे दर जाणून घ्या


सोन्याचांदीचा दर नवी दिल्ली : भारतात 2025 या वर्षात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये ऐतिहासिक वाढ झाली आहे. डिसेंबर 2025 च्या सुरुवातीपर्यंत सोनेच्या दरात 66 टक्क्यांची वाढ झाली होती. तर, चांदीच्या दरात देखील 85 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात कपातीची शक्यता असल्यानं आणि डॉलर कमजोर होणं आणि भारतीय रुपया कमजोर झाल्यानं सोने आणि चांदीच्या दरात वाढ होतेय. चांदीचे दर 2025 मध्ये सोन्याच्या तुलनेत अधिक वाढलेत.

Gold Rate Update : आजचा सोन्याचा दर किती?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एक तोळे सोन्याचा दर 130109 रुपये इतका होता. तर, चांदीचा दर 180701 रुपये प्रति किलो इतका होता. आज एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सहा आठवड्यांचा उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दर कपात आणि फेडमधील बदलाची शक्यता, अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर झाल्यानं सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजाराता स्पॉट सोन्याची किंमत 0.2 टक्क्यांनी घसरुन  4222.93 डॉलर प्रति औंसवर आली आहे. तर, गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या दरात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.

चांदी 2 लाखांचा टप्पा ओलांडणार

चांदीचे दर 2025 मध्ये दुप्पट झालेले आहेत. एमसीएक्सवर चांदी 1 लाख 80 रुपये किलोवर पोहोचली आहे. 2025 मध्ये चांदी 2 लाखांचा टप्पा पार करणार का याकडे गुंतवणूकदाराचं लक्ष लागलं आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या अपेक्षेनुसार 2026 मध्ये देखील चांदीच्या दरातील तेजी सुरु राहू शकते. चांदीचा जागतिक पुरवठा कमी झाल्यानं आणि औद्योगिक वापर वाढल्यानं चांदीचे दर भारतात 2 लाख  30 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

इंडियन बुलियन अँड  ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 128140 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 125070 रुपये इतका आहे. 20 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 114050 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 103790 रुपये आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 82650 रुपये इतका आहे.

31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा दर 75000 रुपयांवर होता. आता सोन्याचा दर 128140 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच सोन्याचा दर 55 हजार रुपयांनी वाढला आहे. तर, चांदीचा दर 31 डिसेंबरला 86000 रुपयांवर होता तो आता 1 लाख 80 हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळं सोने आणि चांदीत गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.