सुनील तटकरेंनी गुंड पाठवून षडयंत्र रचले; महाडमधील राड्यावर भरत गोगावलेंचा गंभीर आरोप, म्हणाले,


सुनील तटकरेंवर भरत गोगावले: रायगडातील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान (Mahad Nagarparishad Election) झालेल्या तुफान हाणामारीनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

Bharat Gogawale on Sunil Tatkare: सुनील तटकरेंनी गुंड पाठवून षडयंत्र रचले

भरत गोगावले म्हणाले की, “विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत. आम्ही कोणती दंडेलशाही करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर हत्यारे घेऊन हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले गेले. जशास तसे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे. पोलिस चौकशीनंतर या घटनेचा तपास केला जाईल. आमच्यावर हत्यारे घेऊन येणाऱ्या या हल्लेखोरांची चौकशी सर्वांसमोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Mahad Shivsena Vs NCP Rada: महाडमध्ये नेमकं काय घडलं?

महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव उसळला. दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा ताफा तैनात केल्याचे पाहायला मिळाले.

Sunil Tatkare: सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

दरम्यान, सुशांत जाबरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदे गटाचा निरोप घेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये प्रचंड तणाव वाढला. आजच्या मतदानावेळी ईव्हीएम बिघाडाची स्थिती आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद पेटला आणि त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. तर हल्ल्याच्या आरोपांवर सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीदरम्यान शांतता राखणे हे आपले कर्तव्य आहे. सकाळपासून काही ‘युवा नेते’ मतदान केंद्रांत शिरत आहेत. मतदान केंद्रात प्रवेशाचा अधिकार केवळ अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधींनाच असतो. पण विकास गोगावले थेट केंद्रात जात आहेत,” असा आरोप सुनील तटकरे यांनी केला.

आणखी वाचा

Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आणखी वाचा

Comments are closed.