सैयारा’ रिलीजच्या आधीच अहानचा अनन्याशी गुपित संवाद; शाहरुखने दिल्या अभिनयाच्या अनोख्या टिप्स – Tezzbuzz

2025 मध्ये बॉलीवूडमध्ये दोन नवोदित कलाकारांनी जोरदार एंट्री घेतली आणि त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मोहित सुरी दिग्दर्शित “सैयारा” हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटातील अहान पांडे (Ahaan Panday)आणि अनित पड्डा यांनी देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकत काही दिवसांतच लोकप्रियता मिळवली.

मात्र, पदार्पणापूर्वी अहान खूपच घाबरलेला होता, हे अलीकडेच इंडिया फिल्म प्रोजेक्ट (IFP) मध्ये अनन्या पांडेने सांगितले. अनन्याने म्हटले की चित्रपटाबद्दल त्यावेळी जवळजवळ कोणालाच माहिती नव्हती आणि अहान किंवा अनित यांची जनतेत ओळख नव्हती. चित्रपटाच्या रिलीजच्या तीन-चार दिवस आधी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची आठवण काढत ती म्हणाली की अहान सतत चिंतेत होता आणि लोक चित्रपट पाहतील का, याबद्दल अनिश्चित होता. अनन्याने त्याला धीर देत चित्रपट नक्कीच चालेल असे सांगितले. अखेर तिचे भाकीत खरे ठरले आणि पहिल्या दिवशी ‘सैयारा’ने तब्बल २२ कोटींचे कलेक्शन केले.

याच कार्यक्रमात अनन्याने शाहरुख खानने दिलेल्या एका खास अभिनय टिपबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “शाहरुख खानने मला एकदा सांगितले होते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा असेच काही घडते तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यबद्दल विचार करण्याऐवजी, त्यांच्याशिवाय जीवन कसे असेल याचा विचार करा. जणू काही जीवन चालू आहे पण ती व्यक्ती तिथे नाही. किंवा त्या व्यक्तीसोबत घालवलेल्या आनंदी क्षणांबद्दल विचार करा. आता कामाच्या आघाडीवर, अनन्या पांडे लवकरच कार्तिक आर्यनसोबत “तू मेरी, मैं तेरा; मैं तेरा, तू मेरी” या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर 2025, ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

कोण आहे सामंथाचा पती राज निदिमोरू? जाणून घ्या दोघांचीही नेटवर्थ

Comments are closed.