कोहली आणि प्रशिक्षक गंभीरमध्ये काहीतरी बिनसलं? या कारणाने विराटचं वनडे क्रिकेट भविष्य धोक्यात, जाणून घ्या सविस्तर

भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांचे भविष्य सतत चर्चेत आहे. अशातच चर्चा सुरू आहे की, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील संबंध हळूहळू खराब होत आहेत. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाले आहेत. NDTVच्या एका रिपोर्टनुसार, रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी तयार आहे. पण विराट कोहली या डोमेस्टिक स्पर्धेमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

NDTVच्या रिपोर्ट्सनुसार एका सूत्राने सांगितले, समस्या विजय हजारे ट्रॉफीभोवती आहे. कोहली या स्पर्धेमध्ये खेळू इच्छित नाही. जर रोहित शर्मा खेळण्यासाठी तयार असले, तर एखाद्या एका खेळाडूसाठी अपवाद कसा करता येईल? असे झाले तर इतर खेळाडूंना काय सांगायचे? म्हणजे कुणीतरी विशेष खेळाडू इतरांपेक्षा वेगळा आहे का?

रोहित शर्मा फक्त विजय हजारे ट्रॉफी नव्हे तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही मुंबईसाठी खेळताना दिसू शकतो. दुसरीकडे, विराट कोहली जास्त तयारीमध्ये तितका उत्सुक नाहीत. त्यामुळे BCCI समोर एक कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण ते फक्त एका खेळाडूसाठी नियम बदलण्याच्या मनस्थितीत नाहीत.

हे देखील महत्त्वाचे आहे की, BCCIची निवड समिती आणि हेड कोच गौतम गंभीर नेहमीच खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सक्रिय राहण्याचा सल्ला देतात. BCCIच्या आदेशानंतरच ऑस्ट्रेलियात खराब प्रदर्शन झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळले होते.

या सगळ्या विवादादरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनीही आपला फॉर्म सिद्ध केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा ने शतक मारले, तर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या ODI मध्ये 57 धावा केल्या. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम ODI मध्ये 74 धावा, तर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये 135 धावा केल्या.

Comments are closed.