शिवसेनेने मुक्ताईनगरमध्ये दहशत माजवली, चंद्रकांत पाटलांनी मारहाण केली, रक्षा खडसेंचा आरोप


रक्षा खडसे : आचारसंहिता संपेपर्यंत पक्षाचा लेबल लावू नये असे आदेश असताना स्वतः आमदार चंद्रकांत पाटील शिवसेनेचे मतदार घालून मतदानासाठी आत गेले होते. या ठिकाणी मतदान केंद्रावर त्यांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केल्याचा आरोप देखील भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री
रक्षा खडसे यांनी केला आहे. जी घटना घडली आहे ती फिर्यादमध्ये आम्ही नोंद करायला लावली असून आमदार चंद्रकांत पाटील व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.  मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत कोणालाही जायचं अधिकार नाही. चंद्रकांत पाटील मतदार आहेत तर त्यांनी मतदान करुन बाहेर यायला पाहिजे होतं, एक ते दीड तास त्यांचं केंद्रात काय काम होतं? असा सवाल देखील रक्षा खडसे यांनी केला. शिवसेनेने मुक्ताईनगरमध्ये  पूर्णपणे दहशत माजवली आहे. नियमाच्या बाहेर या ठिकाणी मतदान केल्याचे खडसे म्हणाल्या.

मतदान केंद्रात तुम्ही सेनेचा प्रचार करत आहात

मतदार घालून मतदान केंद्रात तुम्ही सेनेचा प्रचार करत आहात असं अलाउड नाही. या प्रकरणात मी निवडणूक आयोग पोलीस महानिरीक्षक यांना पत्र दिले आहे, जे काही होईल ते नियमाने व्हायला पाहिजे. आमचे कार्यकर्ते असतो व त्यांचे कार्यकर्ते नियमाच्या बाहेर या ठिकाणी होता कामा नये.  शिवसेनेने मुक्ताई शहरात पूर्णपणे दहशत माजवली नियमाच्या बाहेर या ठिकाणी मतदान केले गेले आहे. दादागिरी करून मारहाण करण्यात आली या पलीकडे अजून मुक्ताईनगर मध्ये काय बघायचं बाकी आहे

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वॉर्ड क्रमांक पाचमध्ये महिला उमेदवार होत्या. त्यांच्या घरातील लोकांचे मतदान हे बाकी असल्याने ते मतदान केंद्रावर गेले होते. मात्र त्यांच्या घरच्यांना तिथे धक्काबुक्की करून मारलं गेलं संपूर्ण दिवसभर अशाच पद्धतीचा दहशतीचा माहोल शहरात होता असे रक्षा खडसे म्हणाल्या. ग्रामीण भागातून भुसावळ मधून बाहेरचे लोक बोलून मुक्ताईनगरमध्ये मस्ती करत आहेत.  दादागिरी करत आहेत रॅली काढत आहेत. मारहाणीची घटना घडली त्या ठिकाणी आमदार स्वतः हजर होते आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे अशी घटना घडत असेल तर त्यांनी ते थांबवायला पाहिजे होतं. मात्र इथले आमदार हे प्रोत्साहन देतात हाच इथल्या आमदारांचा प्रॉब्लेम आहे. अशा लोकांना प्रोत्साहन दिल्यामुळे आज मुक्ताईनगरमध्ये अशा घटना घडत आहेत असे खडसे म्हणाल्या. याबाबत मी निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार केली आहे असे खडसे म्हणाल्या.

चंद्रकांत पाटील यांनी मोठे मन दाखवून भाजपाला विश्वासात का घेतलं नाही?

मुक्ताईनगरच्या इतिहासामध्ये अशा घटना कधी झाल्या नाहीत. मी राजकारणात आल्यापासून वर्षभरात मला दोन वेळा पोलीस स्टेशनला यावं लागलं. यापूर्वी मला पोलीस स्टेशनला यायची कधीही गरज पडली नाही. मात्र माझ्या मुलीसाठी आणि आता कार्यकर्त्यांसाठी मला पोलीस स्टेशनला यावं लागल्याचे खडसे म्हणाल्या. राजकारणात आरोप प्रत्यारोप व्यवस्थापन मात्र अशा पद्धतीचा माज आणणं हे कितपत योग्य आहे. चंद्रकांत पाटील यांना विधानसभेला भाजपने मदत केली आहे. आम्ही जरी खडसे म्हणून बाजूला असलो तरी बाकीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रामाणिक काम केलं होतं असे रक्षा खडसे म्हणाल्या.
त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मोठे मन दाखवून या ठिकाणी भाजपाला विश्वासात का घेतलं नाही? असा सवाल खडसेंनी केला.

चंद्रकांत पाटलांना एवढी खडसेंची भीती का आहे?

चंद्रकांत पाटलांना खडसेची अलर्जी आहे हे सर्वांना माहिती आहे. मात्र मी ही निवडणूक खडसे म्हणून नव्हे भाजपची कार्यकर्ता व खासदार मंत्री असल्याने माझा पक्षाचा विस्तार करण्याचा मला अधिकार आहे. खडसे पाटील हे चंद्रकांत पाटलांच्या डोक्यात आहेत.  चंद्रकांत पाटलांना एवढी खडसेंची भीती का आहे? असा सवाल देखील रक्षा खडसे यांनी केला. मुक्ताईनगर मध्ये निवडणूक लढवताना पक्षाकडून मला सपोर्ट होता असेही त्या म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. त्यातच जळगावमध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमनेसामने आले. त्यामुळे मुक्ताईनगरमधील मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. तर, बोगस मतदार इथं आणल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील हे प्रभाग क्रमांक 17 मधील आदर्श इंग्लिश मीडियम स्कुलच्या मतदान केंद्रावर समोरासमोर आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

आणखी वाचा

Comments are closed.