विराट कोहलीची तुफानी फटकेबाजी! करियरमध्ये पहिल्यांदाच ठोकला भन्नाट ‘नो-लुक’ सिक्स, द. आफ्रिकेचा
विशाखापट्टणममध्ये विराट कोहली नो-लूक सिक्स : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेतील भारताच्या यशात सर्वात मोठी भूमिका विराट कोहलीने बजावली. तीन सामन्यांमध्ये विराटच्या बॅटमधून तब्बल 302 धावा आल्या. मालिकेच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यातही विराटने नाबाद 65 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने पहिल्यांदाच असा एक शॉट खेळला, जो त्याने आपल्या करियरमध्ये यापूर्वी कधीच खेळला नव्हता. त्याच्या या अनोख्या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कॉर्बिन बॉशवर कोहलीचा ‘नो-लुक’ सिक्स
भारतीय डावातील 34वे षटक टाकण्यासाठी आफ्रिकेचा गोलंदाज कॉर्बिन बॉश आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर कोहली पुढे सरकत लॉन्ग ऑनच्या दिशेने षटकार ठोकला. या शॉटमध्ये कोहलीने बॉटम हँडचा अप्रतिम उपयोग केला. चेंडू टाकण्याआधीच त्याची लेंथ बरोबर ओळखून कोहली चेंडूच्या लाईनमध्ये गेला आणि जोरदार फटका मारला. चेंडू बॅटला लागताच तो सीमारेषेबाहेर जाणार असल्याची त्याला खात्री होती, त्यामुळे कोहलीने चेंडूकडे पाहिलेही नाही… असा ‘नो-लुक’ सिक्स त्याने पहिल्यांदाच खेळला. कोहलीचा हा षटकार आता सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हा शॉट आम्ही आधी पाहिला आहे… पण विराट कोहलीला हा शॉट पाहण्याची गरज नाही! 💪🤯🧨#INDvSA तिसरी वनडे, आता थेट 👉 https://t.co/Es5XpUmR5v pic.twitter.com/XcMqixdcG3
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 6 डिसेंबर 2025
कोहलीचे मालिकेत 12 षटकार
या मालिकेत विराटने एकूण 12 षटकार ठोकले. पहिल्या वनडेमधील 135 धावांच्या खेळीत त्याच्या बॅटमधून 7 षटकार आले आणि त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा बहुमानही मिळाला. दुसऱ्या वनडेमध्येही त्याने शतक झळकावले, मात्र त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्या खेळीत कोहलीने 102 धावा करत दोन षटकार ठोकले होते. तिसऱ्या सामन्यात त्याने 3 षटकार मारले. या मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा मानही कोहलीलाच मिळाला. त्याच्या अपूर्व कामगिरीसाठी विराटला ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्कार देण्यात आला.
तिसऱ्या वनडेमध्ये भारताची दमदार कामगिरी
यशस्वी जैस्वाल (नाबाद 116), विराट कोहली (नाबाद 65) आणि रोहित शर्मा (75) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 9 विकेटने धुळधाण उडवली. यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या मदतीने भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य ठेवले होते. डी कॉकने 100+ धावा करत शानदार कामगिरी केली, तर टेम्बा बावुमाने 48 धावा केल्या.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.