Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर

Goa Nightclub Fire: उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी (6 नोव्हेंबर) रात्री उशिरा भीषण आग (Goa Nightclub Fire) लागली. या घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनेची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी रात्रभर बचावकार्य केले. धुराचे लोट आणि मोठ्या ज्वाळांमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला, परंतु डझनभर लोकांना वेळेत बाहेर काढण्यात आले.  राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

 

Comments are closed.