जोगेश्वरीतील ट्रफिकपासून सुटका होणार, जनता कॉलनी – गांधी नगर मार्गावरील भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात

जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील जनता कॉलनी-गांधी नगर पश्चिम द्रुतगती मार्गावरील भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज शुभारंभ पार पडला. यामुळे जोगेश्वरीवासीयांची वाहतूक कोंडीपासून सुटका होऊन त्यांना सुरक्षित व जलद मार्ग उपलब्ध होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सात मार्गिकांच्या भुयारी मार्गाचे काम सुरू झाले होते. मात्र त्यातील एका मार्गिकेचे काम मागील तीन वर्षांपासून वाहतूक पोलीस विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे रखडले होते. नागरिकांना होत असलेल्या वाहतूक काsंडी, असुरक्षितता आणि गैरसोयी लक्षात घेता हे काम तातडीने सुरू होणे अत्यावश्यक होते. स्थानिक शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या माध्यमातून अखेर या प्रलंबित मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नुकताच या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी विभाग संघटक शालिनी सावंत, विभागप्रमुख विश्वनाथ सावंत, विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, विधानसभा समन्वयक लोणा रावत, उपविभाग प्रमुख दिलीप साटम, जयवंत लाड, पैलासनाथ पाठक, उपविधानसभा समन्वयक प्रियांका आंधळे, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, मंदार मोरे, शाखा संघटक सुचित्रा चव्हाण, समीक्षा माळी, वैशाली भिंगार्डे आदी उपस्थित होते.

Comments are closed.