रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या त्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला; पोलिसांनी मुलींना केलं पालक


बुलढाणा क्राईम न्यूज : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद (Jalgaon Jamod) येथील तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना काल (शनिवारी, ता ६) उघडकीस आली होती. टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या या तिन्ही मुली बस स्थानकात शेवटच्या दिसल्या होत्या, त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा मिळालेला नव्हता. या घटनेमुळे मुलींचे पालक घाबरले होते, या मुलींच्या पालकांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी (Police) अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान या अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आल्या.(Jalgaon Jamod)

Buldhana Crime News:  मुली अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळल्या

मुलींच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे व पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ सहा तपास पथके या मुलींच्या शोधासाठी रवाना केली होती. तपासादरम्यान या मुली अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आल्या. सुपा पोलिसांनी या अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन केलं. रात्री जळगाव जामोदला पोहोचल्यानंतर या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. रहस्यमयरित्या गायब झाल्यांना झालेल्या मुलींना शोधून काढण्यात 24 तासात जळगाव जामोद पोलिसांना यश मिळालं आहे.

Buldhana Crime News: क्लासला जातोय सांगून घरातून निघाल्या आणि गायब झाल्या
तेजस्विनी गजानन वसुले, सानिका श्रीराम ताडे आणि चंचल श्रीकृष्ण मोहे या तिन्ही मुलींचे वय अंदाजे 16 वर्षे असून त्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावातील आहेत. नेहमीप्रमाणे त्या टेक्निकल क्लाससाठी घरातून निघाल्या. काही मैत्रिणींनी त्यांना जळगाव जामोद बस स्थानकात पाहिल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्या कोठे गेल्या होत्या, याची कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती.

Buldhana Crime News: नेमके काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली दररोजप्रमाणे सायंकाळी असलेल्या टेक्निकल क्लाससाठी घरून निघाल्या होत्या. मात्र, त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. पालकांनी त्यांचा शोध सुरू केला असता, त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. मुलींच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे व पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ सहा तपास पथके या मुलींच्या शोधासाठी रवाना केली होती. तपासादरम्यान या मुली अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आल्या. सुपा पोलिसांनी या अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन केलं. रात्री जळगाव जामोदला पोहोचल्यानंतर या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं.

आणखी वाचा

Comments are closed.