काहीही संबंध नसताना बोलताय…; दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकताच गौतम गंभीर संतापला, दिल्ली


पार्थ जिंदालवर भारत विरुद्ध एसए गौतम गंभीर: तीन सामन्यांच्या एकदिवीसीय मालिकेत भारताने दक्षिण अफ्रिकेवर 2-1 असा विजय (India vs South Africa) मिळवला. यशस्वी जैस्वालचे पहिले वन-डे शतक आणि रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 9 विकेट्स राखत सहज विजय मिळवला. यशस्वी जैस्वालला सामनावीर आणि विराट कोहलीला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.

भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर अनेकांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) टीका केली होती. दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनीही भारताच्या पराभवावर एक पोस्ट करत भाष्य केलं होतं. घरच्या मैदानावर किती निराशाजनक पराभव झाला. रेड-बॉल स्पेशालिस्ट प्रशिक्षकाकडे वाटचाल करण्याची वेळ आलीय, असंही पार्थ जिंदाल म्हणाले होते. पार्थ जिंदाल यांच्या या प्रतिक्रियेवर आता गौतम गंभीर प्रत्युत्तर दिलंय. (Gautam Gambhir On Parth Jindal)

गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला? (Gautam Gambhir On Parth Jindal)

क्रिकेटशी थेट काहीही संबंध नसलेले लोक आपले मत व्यक्त करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटते. एका आयपीएल मालकानेही स्प्लिट कोचिंगबद्दल लिहिले आहे. जर आपण एखाद्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करत नाही तर त्यांना आपल्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असं स्पष्ट शब्दात गौतम गंभीरने सांगितले. तसेच पहिल्या कसोटीमध्ये आमचा कर्णधार आणि आमचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज दोन्ही डावांत मैदानात उतरू शकला नाही, हेही लोक विसरुन जातात. सध्याच्या कसोटी क्रिकेटच्या संघाता अनुभवाचीही कमी आहे, मात्र याकडे कोणीच बघत नाही, असं गौतम गंभीर म्हणाला.

पार्थ जिंदाल नेमकं काय म्हणाले होते? (Gautam Gambhir On Parth Jindal)

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर किती भयानक पराभव झाला. मला आठवत नाही की आमच्या कसोटी संघाला घरच्या मैदानावर इतकं कमकुवत पाहिलं आहे.जेव्हा रेड-बॉल स्पेशालिस्टची निवड केली जात नाही तेव्हा असंच घडतं. हा संघ रेड-बॉल क्रिकेटमध्ये आमची खोल ताकद अजिबात प्रतिबिंबित करत नाही. भारतीय कसोटी क्रिकेटने रेड-बॉल स्पेशालिस्ट प्रशिक्षकाकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे, असं पार्थ जिंदाल म्हणाले होते.

रोहित आणि जैस्वालची 155 धावांची भागिदारी- (India vs South Africa)

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरून हे स्पष्ट झाले की 271 धावांचे लक्ष्य गाठणे सोपे होईल. तरीही, रोहित आणि जैस्वाल यांनी कोणताही धोका पत्करला नाही. दोघांनीही सुरुवातीला सावधपणे फलंदाजी केली. जैस्वालनेही कोणतेही धोकादायक शॉट्स खेळले नाहीत. मात्र पॉवरप्लेनंतर, रोहित आणि जैस्वाल जोरदार हल्लाबोल चढवला. रोहित आणि जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 155 धावा जोडल्या. 26 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित 73 चेंडूत 75 धावा करत बाद झाला. या डावात रोहितने 3 षटकार आणि 7 चौकार मारले.

संबंधित बातमी:

Team India Next ODI Schedule: दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुढील वर्षीच भारताच्या जर्सीत दिसणार, संपूर्ण Schedule

आणखी वाचा

Comments are closed.