व्लादीमीर पुतीन यांना हिंदुस्थानकडून अनोखे गिफ्ट!

हिंदुस्थान दौऱयावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे रशियात परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानच्या वतीने पुतीन यांना काही अनोख्या भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये रशियन भाषेतील श्रीमद् भगवद्गीता, महाराष्ट्रातील हस्तनिर्मित चांदीचा घोडा, आसाम ब्लॅक टी, आग्रा येथील हस्तकारागीरांनी तयार केलेला संगमरवरी बुद्धिबळाचा संच, कश्मिरी केशर ज्याला स्थानिक पातळीवर कोंग किंवा झफ्रान म्हणून ओळखले जाते, कोरीव नक्षीकाम असलेला मुर्शिदाबादचा चांदीचा चहा सेट अशा वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत.

Comments are closed.