टी-20 वर्ल्ड कप संघात गिलची जागा धोक्यात?; संजूच्या फॉर्मने निवडकर्त्यांन टाकलं विचारात


संजू सॅमसन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आणि टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर संजू सॅमसनने सलामीवीरची जबाबदारी सांभाळली होती. या स्थानावर खेळताना त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक ठोकले होते. मात्र आशिया कपपूर्वी उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची अचानक पुनरागमन झाल्यावर संजूला या जागेवरून बाहेर गेला. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या क्रमांकांवर उतरवण्यात आले, पण तेथे त्याचा प्रभाव दिसून आला नाही.

आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये पुन्हा एकदा ओपनर म्हणून संजूने दाखवून दिले आहे की, या स्थानावर त्याचे आकडे किती भारी आहेत. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 6 डावांत सुमारे 58 च्या सरासरीने 233 धावा कुटल्या आहेत. केरळचा कर्णधार म्हणून तो सलामीला उतरतो आणि आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 56 चेंडूत नाबाद 73 धावा ठोकल्या.

शुभमन गिलसाठीच संजूला ‘बळी’ द्यावा लागत आहे का?

संजूच्या मागील सहा डावांकडे पाहिले तर 51, 19, 43, 1, 46 आणि 76 अशी त्याची कामगिरी आहे. या आकड्यांवरून तो टी20 फॉर्मेटमध्ये सलामीवीरच योग्य असल्याचे स्पष्ट दिसते. पण तरीही त्याची जागा ढवळून काढली जात आहे. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनीही म्हटले होते की, शुभमन गिलमुळे संजू सॅमसनला बळी द्यावा लागत आहे.

टी20I मध्ये संजू सॅमसनचे सलामीवीर म्हणून आकडे

संजू सॅमसनने भारतासाठी खेळलेल्या 51 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 43 डावांत 995 धावा केल्या आहेत. यापैकी 17 डाव त्याने ओपनर म्हणून खेळले आणि त्यात त्याने तब्बल 522 धावा केल्या. सलामीला खेळताना त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. याउलट इतर 26 डावांत त्याच्या नावावर फक्त दोन अर्धशतके आहेत.



आकडे स्पष्ट सांगतात… संजू हा ओपनिंगसाठीच सर्वोत्तम

यावरून त्याचा उत्तम सलामीवीर म्हणून दावा निर्विवाद ठरतो. तरीही त्याच्या फलंदाजी क्रमात वारंवार बदल केले जात आहेत. टीम इंडियासाठी त्याने या फॉर्मेटमध्ये ओपनर म्हणून काय योगदान दिले आहे ते स्पष्ट असूनही तो सतत ‘बळीचा बकरा’ बनतो आहे. आशिया कपमध्ये त्याचा बॅटिंग ऑर्डर बदलला, ऑस्ट्रेलिया मालिकेतही तसेच झाले आणि नंतर त्याला बाहेरही बसवण्यात आले. टीम मॅनेजमेंट त्याच्यावर काहीसा जास्तच प्रयोग करत असल्याची भावना आता बळावत चालली आहे.

हे ही वाचा –

Team India Next ODI Schedule: दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुढील वर्षीच भारताच्या जर्सीत दिसणार, संपूर्ण Schedule

आणखी वाचा

Comments are closed.