ठाण्यात कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; आरोपी युट्युब पत्रकार, एक ताब्यात, दुसरा फरार
ठाणे क्राईम न्यूज ठाणे : ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका महिलेवर सामूहिक अत्याचार (Thane Crime News) झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे. ही घटना गेल्यावर्षी 25 ऑगस्ट रोजी घडली होती. पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली.
नेमकं प्रकरण काय? (Thane Crime News)
पीडित महिलेवर दोघांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केला. ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका महिलेवर दोघांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला. केकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंब न्यायालयाच्या आवारात चार चाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केला.
आरोपी YouTube पत्रकार – (ठाणे महिला लैंगिक अत्याचार प्रकरण)
सदर घटनेतील जे आरोपी आहेत, ते युट्यूब पत्रकार आहेत. त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचे गुन्हे दाखल आहेत. पीडित महिला मसाज सेंटरमध्ये कामाला आहेत, विवाहित आहेत, दीड वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र महिला घाबरली होती, तिने घरी सांगितले नाही. कोणाला काही बोलले नाही, मात्र आरोपीने मागील महिन्यापासून पुन्हा त्या महिलेला शरीरसुखाची मागणी सुरू केली.सतत अशाप्रकारे ही मागणी झाल्याने त्या महिलेने शेवटी गुन्हा दाखल केला.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.