तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत सेंट्रल रेल्वे, साऊथ रेल्वे, इंडियन नेव्ही, वेस्टर्न रेल्वे संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

ऑलिंपिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे), साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे), इंडियन नेव्ही(भारतीय नौदल), वेस्टर्न रेल्वे (पश्चिम रेल्वे) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे) संघाने रिलायन्स रायगड संघाचा 17-2 असा पराभव केला. विजयी संघाकडून अमल कुमार 4, अप्पू एनएस 3, उदय उत्तेकर 2, सार्थक इंद्रे 2, पार्थ अंबुलकर 2, महेश कुटे 1, ऋतुराज बीडकर 1, रोहित बीएस 1, रोहित कुटे 1 यांनी सुरेख खेळी केली. दुसऱ्या सामन्यात अभिनव एएम 6, आदित्यन एबी 3, अंबाडी एनएस 1, आकाश व्हीएस 1, ब्रह्मदत्त एएस 1, स्मृतीकेथ एमआर 1 यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर साऊथ रेल्वे संघाने त्रिवेंद्रम इलेव्हन संघाचा 13-4 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
अन्य लढतीत इंडियन नेव्ही संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 11-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. इंडियन नेव्ही संघाकडून आनंद एमएस 3, भागेश कुटे 2, सुमित प्रसाद 2, संदीप डीएस 1, तमल मिस्त्री 1, अंकित प्रसाद 1)यांनी अफलातून कामगिरी केली. वेस्टर्न रेल्वे संघाने इंडियन एअरफोर्स संघावर 9-5 असा विजय मिळवत आगेकूच केली. स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने आज(21 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहेत.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे): 17(अमल कुमार 4, अप्पू एनएस 3, उदय उत्तेकर 2, सार्थक इंद्रे 2, पार्थ अंबुलकर 2, महेश कुटे 1, ऋतुराज बीडकर 1, रोहित बीएस 1, रोहित कुटे 1)वि.वि. रिलायन्स रायगड: 2(दिनांशू कुटे 1, साहिल कुटे 1); सामनावीर – दिनांशु कुटे;
साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे): 13(अभिनव एएम 6, आदित्यन एबी 3, अंबाडी एनएस 1, आकाश व्हीएस 1, ब्रह्मदत्त एएस 1, स्मृतीकेथ एमआर 1)वि.वि.त्रिवेंद्रम इलेव्हन: 4(आनंद सतीश 3, विसाळ व्ही 1); सामनावीर – अनिश बाबू;
इंडियन नेव्ही(भारतीय नौदल): 11(आनंद एमएस 3, भागेश कुटे 2, सुमित प्रसाद 2, संदीप डीएस 1, तमल मिस्त्री 1, अंकित प्रसाद 1)वि.वि.डेक्कन जिमखाना: 4 (पीयूष सूर्यवंशी 2, बाळासाहेब भिसे 1, विराज ढोकळे 1); सामनावीर – आनंद एमएस;
वेस्टर्न रेल्वे(पश्चिम रेल्वे): 9 (अश्विनीकुमार कुंडे 2, आदित्य थिटे 2, अक्षयकुमार कुंडे 2, भूषण पाटील 1, सारंग वैद्य 1, मनीष खोमणे 1) वि.वि.इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना): 5 (मोंजीथ एमएम 2, प्रवीण 2, लाल कृष्ण 1); सामनावीर – प्रवीण
Comments are closed.