दहावीच्या परीक्षेला युवतीसह 10 बोगस विद्यार्थी; केंद्रप्रमुखांची तक्रार, पोलीस कारवाई

सोलापूर: राज्यात आजपासून एसएससी 10 वी बोर्डाच्या (SSC) परीक्षा आजपासून सुरू झाल्या असून अनेक ठिकाणी कॉपीच्या घटना उघडकीस आल्याने शासनाच्या कॉपीमुक्त अभियानास हरताळ फासण्यात आला आहे.  भरारी पथकाकडून परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणावरुन विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढ्यात वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे दहावीच्या परीक्षेत मराठी पेपरला मंगळवेढा तालुक्यात आढळले चक्क 10 तोतया विद्यार्थी आढळून आले आहेत. या तोतया विद्यार्थ्यांवर केंद्रप्रमुखांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर येथे आज दहावीच्या परीक्षेत चक्क 10 तोतया विद्यार्थी आढळून आले आहेत. त्यामध्ये नऊ विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. मंगळवेढ्यातीलच सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी या शाळेतील विद्यार्थी नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात परीक्षेसाठी होते. परीक्षा सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांची ओळखपत्र तपासणी दरम्यान दहा तोतया विद्यार्थी आढळून आले आहेत. या दहा विद्यार्थ्यांवर केंद्र प्रमुखांनी बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करीत रीतसर पोलीस तक्रार दिली आहे, अशी माहिती केंद्रसंचालक विठ्ठल एकमल्ली यांनी दिली.

मृत ग्रामसेवकाचे नाव 10 वी परीक्षेच्या गलथान पथकात

बीडमध्ये दहावी आणि बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षे दरम्यान शिक्षण विभागाचा गलथान कारभार वारंवार समोर येतोय. 2021 साली आजारपणामुळे निधन झालेल्या ग्रामसेवक अरविंद आगलावे यांच्यावर बैठे पथकाची जबाबदारी देण्यात आली. गटशिक्षण अधिकारी समंदरखान यांनी याबाबतची ऑर्डर इश्यू केली आहे. मात्र, या बैठे पथकात पाच वर्षांपूर्वी निधन झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आल्यानं शिक्षण विभागाबाबत आश्चर्य आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातंय. गटशिक्षण अधिकारी समंदर खान यांनी फोनवर नेहमीप्रमाणे उतर देत पंचायत समितीकडे बोट दाखवले. पंचायत समितीच्या माध्यमातून या नावाची यादी आली होती. त्यामुळे हा प्रकार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षा बाबत शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा वारंवार समोर येतोय. एकीकडे बीड जिल्ह्यात कॉपीच्या घटनांमुळे परीक्षा चर्चेत असताना आता हा नवीनच प्रकार समोर आल्याने पुन्हा नाचक्की होत आहे.

हेही वाचा

Sunetra Pawar: अजित दादांनी लावलेल्या वृक्षाच्या सावलीत सुनेत्रा पवार, 16 वर्षांपूर्वीच्या झाडासोबत भावुक क्षण

आणखी वाचा

Comments are closed.