60 दिवसांसाठी इराण-अमेरिका युद्धबंदी वाढणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराण युद्धाबाबत शस्त्रसंधीचा कालावधी पुन्हा वाढविण्यात येऊ शकतो. हा कालावधी आता 60 दिवसांसाठी वाढविण्यात येईल, अशी शक्यता आहे. या कालावधीत होर्मुझचा मार्ग हळूहळू उघडण्यास अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश तयार झाल्याची माहिती आहे.

मध्यस्थ आणि चर्चेशी संबंधित सदस्यांच्या हवाल्याने ही माहिती सूत्रांनी दिली. यानुसार इराणच्या समृद्ध युरेनियमच्या साठय़ाबाबतदेखील चर्चा सुरू होऊ शकते. होर्मुझचा मार्ग पुन्हा सुरू झाल्यास जगावर निर्माण झालेले इंधनटंचाई आणि महागाईचे संकट दूर होईल. इराणबरोबरचा शस्त्रसंधीचा कालावधी संपायला काही दिवसांचा कालवधी शिल्लक राहिलेला आहे.

Comments are closed.