भंडारा – गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार कर

विधान परिषद निवडणूक 2026 भंडारा गोंदिया: भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापले आहे. संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं (Congress) या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “भाजप फक्त ईव्हीएममुळेच (EVM) जिंकतो, पण बॅलेट पेपरवर (Ballot Paper) आम्हीच बाजी मारणार,” असा थेट आणि मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. (Maharashtra Politics News)

2016 मध्ये जी किमया नानांनी भाजपसाठी केली होती, तीच किमया आता ते काँग्रेससाठी करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नेत्यांची नाना पटोलेंनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचाच उमेदवार रिंगणात उतरवण्याचा आणि त्याला जिंकून आणण्याचा चंग बांधण्यात आला आहे. नाना पटोलेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. याचं कारण म्हणजे 2016 चा इतिहास! 2016 च्या विधान परिषद निवडणुकीत नाना पटोले हे भाजपमध्ये होते. तेव्हाही संख्याबळ नसताना नानांनी आपल्या चाणाक्ष रणनीतीच्या जोरावर भाजपचे परिणय फुके यांना निवडून आणले होते. आता काळ बदललाय आणि नाना पटोले काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे 2016 ला भाजपसाठी ‘चमत्कार’ करणारे नाना, आता 2026 मध्ये काँग्रेससाठी तोच इतिहास पुन्हा घडवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत काँग्रेस ऐनवेळी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

अमरावती विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून सध्या प्रवीण पोटे यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे हे इच्छूक आहेत. मात्र, राणा दाम्पत्याचा प्रवीण पोटे यांना विरोध आहे. तर काँग्रेसकडून ऐनवेळी मोठी घोषणा होऊ शकते, अशी चर्चा आहे. पोटे यांना टक्कर द्यायची असेल तर यशोमती ठाकूर यांनी निवडणूक लढावी, अशी चर्चा अमरावतीत सुरु आहे. तर प्रवीण पोटे यांना पराभूत करण्यासाठी आमदार रवी राणा यांची फोनवरून अनेक नेत्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. रवी राणा हे त्यांचे भाऊ सुनील राणा यांना मैदानात उतरवणार अशी चर्चा असून राणा हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत ही चर्चा करत असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेचे अकोला येथील माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया हे देखील अपक्ष किंवा काँग्रेसकडून निवडणूक लढू शकतात अशी पण चर्चा आहे. परंतु, सध्या अमरावती विधान परिषदची जागा ही महायुतीसाठी पूर्णपणे सेफ झोनमध्ये आहे. एकूण 453 मतदारांपैकी जवळपास 248 मते महायुतीकडे आहेत. त्यामुळे महायुतीला याठिकाणी सहजपणे विजय मिळण्याची शक्यता आहे.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी: 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

आणखी वाचा

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील

Vidhan Parishad Election 2026: भंडारा – गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम; भाजपसह, राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकला; जिंकेल मात्र काँग्रेसचं, नाना पटोलेंचा दावा

आणखी वाचा

Comments are closed.