आठ दिवसांत 7 खून; नागपूर बनले मर्डर कॅपिटल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असूनही राज्याची उपराजधानी नागपूर हे मर्डर कॅपिटल बनले आहे. अवघ्या आठ दिवसांत नागपुरात 7 खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरात चुलत आजीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच हिंगणा परिसरात कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने लहान भावाची निर्घृण हत्या केली. नागपुरातील लश्करीबागेत एका ज्येष्ठ महिलेचा गळा चिरून तिचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. नंदनवनमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यासारख्या एकूण आठ दिवसांत 7 खून झाले आहेत.

Comments are closed.