‘ग्रीन कार्ड’चे नियम आता आणखी कडक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेने एच-1बी व्हिसा आणि ग्रीन कार्ड संबंधित नियम आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. गरज असेल तरच ग्रीन कार्ड मंजूर करावे, असे स्पष्ट निर्देश अमेरिकन इमिग्रेशन एजन्सी यूएससीआयएसने अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या हिंदुस्थानी आयटी इंजिनीअर, तंत्रज्ञान कर्मचारी आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेत राहून ग्रीन कार्डची प्रक्रिया पूर्ण करणे पूर्वीइतके सोपे राहणार नाही. आता बहुतेक लोकांना आपल्या देशात परत येऊन अमेरिकन दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अमेरिकेत एच-1बी व्हिसा मिळवणाऱ्यांमध्ये हिंदुस्थानी नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. एका अहवालानुसार मंजूर झालेल्या एकूण एच-1बी व्हिसा अर्जांपैकी जवळपास 71 टक्के हिंदुस्थानी नागरिक आहेत. हजारो हिंदुस्थानी 10 ते 15 वर्षांपासून ग्रीन कार्डची वाट पाहत आहेत. आता अंतिम टप्प्यात नियम बदलल्याने त्यांची अडचण वाढली आहे. अनेक लोकांनी अमेरिकेत घरे खरेदी केली असून मुलांचे शिक्षणही तिथेच सुरू आहे.

Comments are closed.