शिवराज मोटेगावकरांची भोंदूगिरी, बेंचवर चढून विद्यार्थ्यांवर पवित्र पाणी शिंपडतानाचा व्हिडीओ व्ह
शिवराज मोटेगावकर NEET परीक्षेचा पेपर फुटला: देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षा घोटाळ्याच्या तपासात अनेक धक्कादेणारा माहिती समोर येत असून या प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच आता या प्रकरणातील प्रमुख शिवराज मोटेगावकरचा (Shivraj Motegaonkar) आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरएल झाल्याचे समोर आलं आहे. यात मोटेगावकर क्लासमध्ये विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातून पाणी शिंपडत असल्याचे दिसून येतंय. तर ‘तुम्ही एम्सला लागणार’ असा दावा या व्हिडीओत्यामुळे कला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. परिणामी या प्रकरणी अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
लातूर NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात असलेले RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मोटेगावकर क्लासमधील विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताच्या सहाय्याने शिंपडताना दिसत आहेत. तसेच ‘तुम्ही एम्समध्ये लागणार’ असा दावा ते विद्यार्थ्यांसमोर करत असल्याचेही व्हिडिओत ऐकू येत आहे.
शिवराज मोटेगावकर : मोटेगावकरकडून तंत्र-मंत्र किंवा अंधश्रद्धेसारख्या गोष्टींचा आधार?
दरम्यानहा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित असताना अशा प्रकारच्या कृतीमुळे आता मोटेगावकर तंत्र-मंत्र किंवा अंधश्रद्धेसारख्या गोष्टींचा आधार घेत होते का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यानNEET पेपरफुटी प्रकरणातील तपास सीबीआयकडून वेगाने सुरू असून, लातूरमधील काही डॉक्टर, पालक आणि विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
NEET Exam Paper Leak Case : सीबीआयकडून देशातील विविध शहरांमध्ये प्रकरणाचा तपास, घोटाळ्याचा केंद्रबिंदू पुणे
NEET च्या या पेपर फुटीची व्याप्ती वाढत चाललीय. पेपर फोडणारे, त्यांची विक्री करणारे अटकेत आहेत. तर ज्यांनी स्वतःच्या मुलांसाठी पेपर विकत घेतला असे पालक चौकशीच्या फेऱ्यात आहेत. पुणे , लातूर आणि इतरही शहरांतील अनेक डॉकटर्सची सीबीआयकडून चौकशी केली जातेय. स्वतःच हॉस्पिटल पुढं चालवायचं असेल तर स्वतःच्या मुलाला देखील डॉक्टर बनवावं लागेल, हे ओळखून या डॉकटर्सनी लाखो रुपये मोजून NEET चा फुटलेला पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास देशातील विविध शहरांमध्ये होत असला तरी या घोटाळ्याचा केंद्रबिंदू पुणे असल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय. त्यामुळं कोणाच्या प्रभावाने या शिक्षकांची NTA मध्ये नियुक्ती झाली हा प्रश्न विचारला जातोय .
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.