'झुरळ' पार्टीची वेबसाइट काढून टाकली
वेबपृष्ठेही हॅक, अॅक्सेस आता झाला अशक्य
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशल मिडियावर निर्माण करण्यात आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची वेबसाईट हटविण्यात आली आहे. तसेच या या तथाकथित पक्षाची वेबपृष्ठेही हॅक करण्यात आली असून त्यांच्यावर जो मजकूर प्रसिद्ध केला जाईल, त्याला मी जबाबदार असणार नाही, असे या पक्षाचा संस्थापक अभिजित दिपके यांने प्रतिपादन केले आहे. 10 लाख युवकांनी आपल्या या कथित चळवळीत नावे नोंदविली आहेत, असे त्याचे म्हणणे आहे. अनेकांनी त्याच्या दाव्यांवर शंका उपस्थित केल्या आहेत.
भारत सरकारने आपल्या वेबसाईटविरोधात कारवाई चालविली आहे, असा आरोप दिपके याने केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा त्याग करावा यासाठी आम्ही चळवळ करीत आहोत. 6 लाख युवकांनी या चळवळीला पाठिंबा दिला आहे, असेही दिपके याचे म्हणणे आहे. या युवकांनी आमच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ‘नीट-युजी’ प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने लक्षावधी विद्यार्थी प्रधान यांच्यावर नाराज आहेत, असा आरोप त्याने केला.
नव्याने प्रयत्न करु
केंद्र सरकारने आमची मागणी दाबण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, आम्ही नव्याने प्रयत्न करणार आहोत. झुरळे कधी मरत नाहीत. आम्ही अन्य मार्गांनी आमची चळवळ पुढे नेणार आहोत, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, त्याने केलेल्या पाठिंब्याच्या दाव्यासंबंधी संगणक तज्ञांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्याला पाठिंबा देणाऱ्यापैकी बहुसंख्य सोशल मिडिया खातेधारक पाकिस्तान, तुर्किये, बांगला देश आणि इतर देशांमधील आहेत, अशीही आकडेवारी देण्यात आली आहे. दिपके याने त्याच्यावरचे आणि पक्षावरचे सर्व आरोप नाकारले आहेत.
फसली एक ‘चळवळ’
ज्यांनी इन्स्टाग्राम किंवा अन्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर भारतीय जनता पक्षाला फॉलो केले आहे, त्यांनी या पक्षाला ‘अनफॉलो’ करावे, असे आवाहन कॉक्रोच जनता पक्षाने ऑन लाईन केले होते. तथापि, या आवाहनानंतर भारतीय जनता पक्षाच्या फॉलोअर्सच्या संख्येत एक लाखाहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे या तथाकथित पक्षाची ही एक चळवळ फसल्याचा आरोप केला जात आहे.
Comments are closed.