सोने 3 लाख, तर चांदी 5 लाखांच्या पुढे जाणार; रॉबर्ट कियोसाकी यांच्या नव्या भविष्यवाणीने वाढवली
Gold-Silver Price Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये (Gold-Silver Price Prediction) दिग्गज मार्केट अॅनालिस्ट ‘जिम रेकॉर्ड्स’ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, येणाऱ्या काळात सोने १,००,००० डॉलर प्रति औंस (Ounce) या ऐतिहासिक पातळीवर पोहोचू शकते. तर चांदी देखील २०० डॉलर प्रति औंस या ऑल-टाइम हाय लेव्हलला स्पर्श करेल.(Gold-Silver Price Prediction)
Gold-Silver Price Prediction: “बाजार कोसळणार हे निश्चित!” – कियोसाकी
कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मार्केटमध्ये मोठी घसरण होणे निश्चित आहे. जिम रेकॉर्ड्स यांचा अंदाज आहे की सोने १,००,००० डॉलरवर पोहोचेल. सध्या सोन्याची किंमत सुमारे ४,५०० डॉलरच्या आसपास आहे. तसेच मला वाटते की चांदी २०० डॉलर प्रति औंसवर जाईल, जी सध्या ७५ डॉलरवर आहे.”(Gold-Silver Price Prediction)
कियोसाकी यांचे हे वक्तव्य अतिशय महत्त्वाच्या वेळी आले आहे, जेव्हा जागतिक बाजारपेठ आधीच वाढता भू-राजकीय तणाव, सातत्याने वाढणारी महागाई, देशांवरील वाढते सरकारी कर्ज आणि केंद्रीय बँकांच्या धोरणांबाबतच्या अनिश्चिततेचा सामना करत आहे. यासोबतच त्यांनी बिटकॉइन (Bitcoin) देखील ७,५०,००० डॉलरवर पोहोचणार असल्याचा दावा केला आहे.(Gold-Silver Price Prediction)
Gold-Silver Price Prediction: जग नेमके कोणत्या दिशेने चालले आहे?
कियोसाकी यांच्या या इशाऱ्यामुळे जग एका मोठ्या आर्थिक बदलाच्या (Financial Reset) दिशेने वाटचाल करत आहे का, या चर्चेला उधाण आले आहे. हा आर्थिक बदल गुंतवणूकदारांना अखेर सुरक्षित आणि ठोस मालमत्तेकडे (Hard Assets) वळण्यास भाग पाडू शकतो.
गुंतवणूकदारांना सल्ला देताना कियोसाकी म्हणाले, “सर्वोत्तम गुंतवणूकदार तेच असतात जे भविष्य आधीच पाहू शकतात आणि त्यानुसार पावले उचलतात. लक्षात ठेवा, या आर्थिक मंदीत किंवा घसरणीत (Crash) तुम्हाला बळी ठरण्याची गरज नाही. उलट या परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्ही अधिक श्रीमंत होऊ शकता.”
गेल्या अनेक वर्षांपासून कियोसाकी सातत्याने केवळ कागदी चलनावर (करन्सी) किंवा पारंपरिक वित्तीय माध्यमांवर अवलंबून राहण्याऐवजी सोने, चांदी आणि बिटकॉइनसारख्या प्रत्यक्ष व ठोस मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा आग्रह धरत आहेत. त्यांच्या या नवीन विधानाने त्यांच्या जुन्या विचारांना पुन्हा एकदा बळकटी दिली आहे.
Gold-Silver Price Prediction: इतर मार्केट एक्सपर्ट्सचे मत काय आहे?
वाढता भू-राजकीय तणाव आणि देशांवर वाढणारे कर्ज पाहता, काही मार्केट तज्ज्ञ कियोसाकी यांच्या विधानाशी अंशतः सहमत आहेत की आगामी काळात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच राहील. मात्र, काहींनी कियोसाकी यांच्यावर टीकाही केली आहे, कारण ते गेल्या अनेक वर्षांपासून बाजार कोसळण्याची एकसारखीच भाकिते करत आले आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि वर्ल्ड बँक यांच्या ताज्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर सरकारी कर्ज १०० ट्रिलियन डॉलरच्या पार गेले आहे, जे जगाच्या एकूण जीडीपीच्या (GDP) जवळपास ९४% आहे. सध्या अमेरिका, जपान, सुदान आणि सिंगापूरसारखे अनेक मोठे देश प्रचंड कर्जाच्या खाईत अडकले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.