Skin Prombles: तासनतास एसीमध्ये बसल्यास त्वचेवर काय परिणाम होतात?

सध्या वाढत्या उन्हाळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण घर असो वा ऑफिस, तासनतास एसी मध्ये बसणे पसंत करतात. एसीमुळे उकाड्यापासून त्वरित आराम मिळत असला तरी सतत एसीच्या वातावरणात राहणे  त्वचेसाठी अत्यंत घातक ठरू शकते. आज आपण तासनतास एसीमध्ये बसल्यास त्वचेवर काय परिणाम होतातआणि त्यावरील उपाय जाणून घेऊयात..

त्वचा कोरडी होणे –

एसी खोलीत जास्त वेळ बसल्यास त्वचा कोरडी पडते. कारण एसी हवेतील सर्व ओलावा शोषून घेतो. परिणामी हवेत आर्द्रता न राहिल्यामुळे त्याचा थेट परिणाम होतो. तुम्ही जर सतत अशा वातावरणात बसत असाल तर ते त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा – Korean Beauty Tips :गुलाबी गाल हवेत? हे कोरियन ब्युटी सिक्रेट करा ट्राय

अकाली वृद्धत्व –

त्वचा निरोगी हवी असल्यास त्वचेसमध्ये नैसर्गिक ओलावा आणि लवचिकता असणे गरजेचे आहे. मात्र, जेव्हा आपण एसीमध्ये बसतो तेव्हा त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू लागते. तसेच सुरकुत्या येणे, बारीक रेषा येणे अशा समस्या सुरू होतात.

खाज सुटणे –

ज्या व्यक्तीची त्वचा संवेदनशील आहे किंवा ज्यांना सोरायसिससारखे आजार आहेत, अशांना एसीमुळे जास्त त्रास होतो. एसीमुळे त्वचा कोरडी झाल्याने खाज सुटते आणि रॅशेस सुद्धा येतात.

उपाय काय कराल?

मॉइश्चरायझरचा वापर – एसीमध्ये बसण्यापूर्वी आणि बसल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावा.

भरपूर पाणी प्या – शरीर आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून 3 ते 4 लीटर पाणी प्या.

एसीचे तापमान –एसीचे तापमान अगदीच कमी न ठेवता ते 24°C ते 26°C दरम्यान ठेवावे.

ब्रेक घ्या – सतत 8 तास एसीमध्ये बसून राहण्याऐवजी मध्येच थोडा वेळ नैसर्गिक हवेत फिरा.

हेही वाचा – Beauty Tips : परफेक्ट विंग्ड आयलाइनर लावायचंय? मग ‘या’ ट्रिक्स नक्की वापरा

Comments are closed.