संशयास्पद चॅट्स अन् ‘GOD’ नावाचा नंबर; मनीषा हवालदारच्या पतीचा मोबाईलमध्ये सापडली चॅटिंग, व्हॉट

पुणे :  नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातून अटक केलेल्या मनिषा हवालदारच्या (NEET Paper Leak Pune Crime) पतीच्या मोबाइलमध्ये तो “गॉड” कोण? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. हवालदारच्या पतीच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकासोबत संशयास्पद (NEET Paper Leak Pune Crime) संवाद झाल्याचे समोर आले आहे. “गॉड” नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयला आढळून आले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचा खरा ‘गॉडफादर’ कोण, याचा तपास वेगाने सुरू आहे. डिलीट करण्यात आलेल्या चॅट्समधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.(NEET Paper Leak Pune Crime)

NEET Paper Leak Pune Crime : मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने नंबर सेव्ह…

मनिषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह नंबरसोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयला आढळले आहेत. सीबीआयने ‘सेलेब्राइट प्रीमियम’ या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाइलचे डिजिटल एक्स्ट्रॅक्शन करण्यात आले. तपासादरम्यान तिने सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सॲप मेसेजेस डिलीट केल्याची कबुली दिली आहे.

NEET Paper Leak Pune Crime : मनिषा हवालदारच्या घराची सीबीआयकडून झाडाझडती

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यात मोठी कारवाई करत राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) पॅनलवरील फिजिक्स विषयाच्या तज्ज्ञ मनीषा संजय हवालदार हिला शुक्रवारी अटक केली. प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कटात तिचा सहभाग असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयच्या पथकाने २२ मे रोजी सदाशिव पेठेतील त्यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली. या कारवाईत मोबाइल, लॅपटॉप, हार्ड डिस्क, नीट प्रश्नपत्रिकांच्या प्रती, हस्तलिखित नोंदी,
तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

घरातून १ लाख १ हजार ९३० रुपयांची रोकडही हस्तगत केली आहे. आर्थिक मोबदल्यासाठी मनीषा मांढरेशी संगनमत करून काही विद्यार्थ्यांना हवालदार हिने प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात रोख रक्कम स्वीकारल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे. तपासादरम्यान हवालदार हिने फिजिक्स विषयाचे प्रश्न एकाला पाठवल्याची कबुली दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. संबंधित प्रश्न व्हॉट्सॲपने शेअर करण्यात आले, तसेच त्यांचे प्रिंटआऊटही काढण्यात आल्याचे उघड झाले. प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात रोख रक्कम स्वीकारल्याचाही आरोप आहे. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, मनीषा हवालदार हिने फिजिक्सच्या प्रश्नांची हस्तलिखित नोंद स्वतःकडे ठेवली होती. चौकशीची चाहूल लागताच तिने काही व्हॉट्सॲप चॅट डिलीट केल्याचे आणि प्रश्नसंचाशी संबंधित नोट्स जाळून नष्ट केल्याचेही तपासात स्पष्ट झाले. डिजिटल फॉरेन्सिक तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.

NEET Paper Leak Pune Crime :  पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्स जाळल्या अन्…

बायोलॉजी विषयाची प्राध्यापिका मनीषा मांढरे सोबत केलेले चॅटिंग सुद्धा मनीषा हवालदार हिने डिलिट केले होते. त्याचबरोबर मनिषा हवालदार आणि मनिषा मांढरे यांच्यामधील व्हॉट्सॲप मेसेज डिलीट केले. मनिषा हवालदारने पतीच्या फोनवरून सुद्धा काही प्रश्नसंच मनिषा मांढरेला पाठवले असल्याची सूत्रांची माहिती आहे.(NEET Paper Leak Pune Crime)

सीबीआयने केलेल्या चौकशीत मनिषा हवालदारने, नीट परीक्षेशी संबंधित ज्या भौतिकशास्त्राच्या नोट्स त्यांनी स्वतः तयार केल्या होत्या, हवालदारने जाळून टाकल्याची माहिती आहे. तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा त्यांच्या हाती कोणतेही लेखी पुरावे लागू नयेत, या उद्देशाने ते जाळण्याचा प्रयत्न केला.

NEET Paper Leak Pune Crime :  मांढरेसोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटिंग आणि मेसेज केले डिलीट

हवालदारने फक्त लेखी नोट्सच नाही, तर डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठीही मनिषा हवालदारने सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅटिंग आणि मेसेज डिलीट केले. सापडू नये यासाठी मेसेज हटवले असल्याची माहिती आहे, सीबीआय आता हे तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.

मनीषा हवालदारनी आपल्या पतीच्या फोनचा देखील वापर केला होता. पतीच्या मोबाईलवरून तिने मनीषा मांढरे हिला प्रश्नमालिका पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पतीच्या फोनवरून पाठवलेले हे मेसेज आता या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत.

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.