IPL 2026 – प्लेऑफची आशा! KKR च्या ताफ्यात नव्या दमाचा खेळाडू
कोलकाता नाईट रायडर्सचे प्लेऑफचे भवितव्य आता राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहे. तत्पूर्वी केकेआरने आपल्या ताफ्यात नव्या दमाच्या लनवीथ सिसोदियाला संघात सामिल करून घेतलं आहे. खापतग्रस्त वेगवान गोलंदाज मथीशा पाथिरानाऐवजी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. त्याच्या येण्याने संघात यष्टीरक्षण आणि फलंदाजीचे पर्याय वाढले आहेत.
कर्नाटककडून खेळणाऱ्या सिसोदियांने 15 टी-20 सामन्यांत 124 धावा केल्या असून, यापूर्वी तो आरसीबी आणि केकेआरचा भाग राहिला आहे. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी सांगितले की, केकेआर सध्या खेळाडूंच्या दुखापतींशी झगडत आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असतानाही खेळत आहे, तर अंगक्रिश रघुवंशी दुखापतींमुळे आधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
राजस्थान आणि मुंबई यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान जिंकल्यास इतर संघांचे आव्हान संपुष्टात येईल. मात्र, राजस्थानचा पराभव झाल्यास दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा कोलकाताचा अंतिम साखळी सामना त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ असा ठरणार आहे. केकेआरसाठी प्लेऑफची शर्यत जिवंत राहणार की त्यांचे आव्हान संपणार, हे आता इतर सामन्यांच्या निकालावर स्पष्ट होईल.
Comments are closed.