राजस्थान-मुंबई सामन्यात मोठा ड्रामा! आधी विकेटचं सेलिब्रेशन, मग नो-बॉलचा धक्का; जडेजा-शार्दुलची
Ravindra Jadeja Tease Shardul Thakur Video : रविवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात शेवटच्या षटकात भन्नाट ड्रामा पाहायला मिळाला. राजस्थानच्या डावाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर आमनेसामने आले आणि त्यांच्यातील मजेशीर भांडण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं.
19.4 चेंडू – शार्दुल ठाकूरने जडेजाची विकेट घेतली आणि शार्दुलने जडेजाला चिडवले. पण तो नो बॉल आहे.
19.4 चेंडू – चार, जडेजा शार्दुलला चिडवत आहे.
19.5 चेंडू – चौकार, जडेजाने पुन्हा शार्दुलला चिडवले.
जडेजा आणि ठाकूर मधली मजेदार धमाल 😂 pic.twitter.com/YPjH9zVmWl
— विकास (@Vikas662005) 24 मे 2026
शेवटच्या षटकात काय घडलं?
मुंबईकडून शेवटचं षटक शार्दुल ठाकूर टाकत होता. चौथ्या चेंडूवर जडेजाने कव्हर्समध्ये फटका मारला, पण तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. विकेट मिळाल्याच्या आनंदात शार्दुलने जोरदार सेलिब्रेशनही सुरू केलं. मात्र, काही क्षणातच नो-बॉलचा सायरन वाजला आणि सगळंच चित्र बदललं. विकेट रद्द झाल्यानंतर जडेजा आणि शार्दुल दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं.
ते त्याला कारणासाठी 'सर जडेजा' म्हणतात! ⚔️
तो म्हणून उत्कृष्ट आहे येथे विनोद #रविंद्रजाडेजा ते परत देते #शार्दुलठाकूर नो-बॉलमुळे टिकून राहिल्यानंतर. 😅#TATAIPL प्लेऑफची शर्यत 2026 👉 #MIvRR | आता थेट 👉 https://t.co/uaJNPFVnTi pic.twitter.com/dULQvAdd4e
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 24 मे 2026
यानंतर पुढचा चेंडू फ्री-हिट होता. जडेजाने या संधीचा पुरेपूर फायदा घेत जोरदार चौकार ठोकला. चौकार मारल्यानंतर त्याने भन्नाट सेलिब्रेशन करत मजेशीर अंदाजात शार्दुलला चिडवलं. एवढंच नाही तर पुढच्याच चेंडूवर पुन्हा चौकार लगावत जडेजाने राजस्थानचा स्कोअर 200 पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
😂💙🩷 ज्या प्रकारची धमाल आम्हाला पाहायला आवडते#TATAIPL | #खेळबिंदास | #MIvRR | @mipaltan | @rajasthanroyals pic.twitter.com/j9A7YIphGr
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 24 मे 2026
या सामन्यात जडेजाने 11 चेंडूत 19 धावांची झटपट खेळी केली. त्याने नांद्रे बर्गरसह अवघ्या 12 चेंडूत 30 धावांची भागीदारी करत राजस्थानला 205 धावांपर्यंत पोहोचवलं. विशेष म्हणजे जडेजा आणि शार्दुल याआधी चेन्नई सुपर किंग्सकडून एकत्र खेळले असल्याने मैदानावरील ही मस्ती चाहत्यांना अधिकच आवडली.
शार्दुल ठाकूरने रवींद्र जडेजाला बाद केल्यानंतर त्याची छेड काढली.
नो बॉल निघतो:
जडेजाने त्याच प्रतिक्रियेने त्याचा बदला घेतला. 🤣 pic.twitter.com/tIbaOo5PcO
— विश्वास बिश्नोई (@VishwasDhayal29) 24 मे 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.