IPL 2026 – अनकॅप्ड खेळाडूंमधला बादशहा! प्रभसिमरन सिंहची बॅट तळपली आणि इतिहास घडला, अशी कामगिरी करणारा पहिलाच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीसह अनेक तरुण तडफदार हिंदुस्थानी खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. यामध्ये आता प्रभसिमरन सिंहच नाव सध्या चांगलच गाजताना दिसत आहे. पंजाब किंग्सचा हा पठ्ठ्या सध्या तुफान फॉर्मात आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या सोबतीने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शनिवारी (23 मे 2026) झालेल्या सामन्यात त्याने उत्कृष्ट फटकेबाजी केली. सुरुवातीला झटपट विकेट गेल्याने संघ अडचणीत असताना प्रभसिमरन सिंहची अर्धशतकीय खेळीच संघाच्या विजयाचा आधार ठरली. या खेळीसह त्याने IPL च्या इतिहासात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एक असा विक्रम जो आजपर्यंत एकाही अनकॅप्ड खेळाडूला जमलेला नाही.

पंजाब किंग्स संघाच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने यंदाच्या हंगामात 500 हून अधिक धावा चोपून काढल्या आहेत. मागील हंगामताही त्याची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने IPL 2025 मध्ये 549 धावा केल्या होत्या. त्यामुळे सलग दोन हंगामांमध्ये 500 हून अधिक धावा चोपून काढणारा IPL च्या इतिहासातील तो हिंदुस्थानचा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी धडाकेबाज कामगिरी इतर कोणत्याही खेळाडू करता आलेली नाही. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 39 चेंडूंमध्ये 69 धावांची वादळी खेळी केली आणि 500 धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे चौफेर फटकेबाजी करताना त्याने अवघअया 26 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण करत संघाच्या खात्यात धावांची भर घातली.

सामना खिशात घातल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यराने प्रभसिमर सिंहच तोंडभरू कौतुक केलं. तो म्हणाला की, प्रभसिरमन गोलंदाजांवर तुटून पडला होता, त्याने दाखवून दिलं की तो काय करू शकतो. फलंदाजी करत असताना एकमेकांशी संवाद साधत असल्यामुळे सामन्यावर आमची पकड निर्माण झाली, असं अय्यर म्हणाला आहे.

Comments are closed.