फक्त ‘त्या’ 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, क

राजस्थान रॉयल्स आयपीएल 2026 प्लेऑफसाठी पात्र: आयपीएल 2026 चा 69 वा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. ‘करो या मरो’ च्या या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईचा 30 धावांनी धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानच्या या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) या दोन्ही संघांचे प्लेऑफचे स्वप्न भंगलं असून ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. राजस्थान रॉयल्सला संकटातून बाहेर काढत प्लेऑफचे तिकीट मिळवून देणारा खरा हिरो इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ठरला.

आर्चरच्या ‘त्या’ 15 चेंडूंनी फिरवला सामना (Jofra Archer MI vs RR IPL 2026)

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत राजस्थानची अवस्था 5 बाद 119 अशी केली होती. राजस्थानचा संघ स्वस्तात आटोपणार असे वाटत असतानाच, जोफ्रा आर्चर मैदानात उतरला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले.

आर्चरने केवळ 15 चेंडूंमध्ये 32 धावांची स्फोटक खेळी खेळली. 213.33 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 1 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकले. आर्चरच्या या अनपेक्षित आणि वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 205 धावांचा डोंगर उभारला.

गोलंदाजीतही मुंबईचे कंबरडे मोडले (जोफ्रा आर्चर MI vs RR IPL 2026)

206 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. फलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर जोफ्रा आर्चरने चेंडू हातात घेताच मुंबईच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्माला शून्यावर बाद करून मोठा धक्का दिला. त्यानंतर त्याने नमन धीरला बाद करत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. पांड्याही 34 धावा करून बाद झाला. आर्चरने या सामन्यात सर्वाधिक 3 बळी घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले आणि मुंबईचा डाव 175 धावांवर रोखला.

प्ले-ऑफचे संपूर्ण वेळापत्रक (IPL 2026 Play-off Schedule)

लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर आता अंतिम 4 संघ निश्चित झाले असून प्ले-ऑफचा थरार रंगणार आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांनी अव्वल 4 मध्ये जागा मिळवली आहे.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) – क्वालिफायर-1 (Qualifier 1)
  • सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) – एलिमिनेटर

हे ही वाचा –

MI vs RR IPL 2026 : बालेकिल्ल्यात मुंबईचं राजस्थानपुढं लोटांगण, मुंबईकर खेळाडूंच्या दोन टीम बाहेर, अजिंक्य रहाणेच्या कोलकाता आणि श्रेयस अय्यरच्या पंजाबचा प्रवास संपला

आणखी वाचा

Comments are closed.