Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन…

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन…

देशभरात गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियातील पॉवर दाखवून देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या अकाऊंटची आणि त्याचे संस्थापक अभिजीत दिपकेंची जोरदार चर्चा सुरु आहे. एकेकाळी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा भाग राहिलेल्या अभिजीत दिपकेच्या या पक्षाबाबत आण्णा हजारेंना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी कॉक्रोज जनता पार्टीचं समर्थन केलंय. झुरळ हे नाव योग्य नसलं तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे, असे आण्णा हजारे यांनी म्हटलं. आता, आण्णा हजारेंच्या या वक्तव्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच मी आण्णा हजारेंची भेट घेणार असल्याचं महाजन यांनी म्हटलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकांनी सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा निषेध करत कॉक्रोच जनता पार्टी असे नाव ठेऊन सोशल मीडियात अकाऊंट बनवलं होतं, अवघ्या 5 दिवसांतच या अकाऊंटवर 1 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स झाल्याने देशभरात याची चर्चा सुरू होती. अनेक राजकीय पक्षांनी या पार्टीचं समर्थन करताना, ही देशातील तरुणाईची भावना असल्याचे म्हटले. आता, आण्णा हजारे यांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे. झुरळ हे नाव योग्य नसलं तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे, असे आण्णांनी म्हटलं. मुळात हे समजून घेतलं पाहिजे की, या पार्टीने झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता? नाव योग्य नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे देशातील तरुण उभा राहिला हे महत्त्वाचे आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे, या दोन्हीचा संगम होतो तेव्हा सरकारने त्याचा अव्हेर न  करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला.

Comments are closed.