दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले,
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स : आयपीएल 2026 च्या लीग स्टेजचा थरारक समारोप झाला आहे. इडन गार्डन्सवर खेळवल्या गेलेल्या 70 व्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) कोलकाता नाइट रायडर्सवर (KKR) 40 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या पराभवासोबतच केकेआरच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. त्यांची या हंगामातील सुरुवात आणि शेवट दोन्ही पराभवानेच झाला.
ईडन येथे एक गर्जना करणारा साइन-ऑफ. 💙❤️ pic.twitter.com/JUkELIQvwZ
— दिल्ली कॅपिटल्स (@DelhiCapitals) 24 मे 2026
राहुल आणि अक्षर चमकले (DC vs KKR IPL 2026)
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 5 बाद 203 धावांचा विशाल डोंगर उभारला. सलामीवीर केएल राहुलने अवघ्या 30 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 60 धावांची तुफानी खेळी केली. त्याला कर्णधार अक्षर पटेल (39 धावा, 25 चेंडू), डेव्हिड मिलर (28 धावा) आणि अभिषेक पोरेल (22 धावा) यांनी उत्तम साथ दिली. अखेरच्या षटकांत आशुतोष शर्माने 11 चेंडूंत नाबाद 18 धावा करत दिल्लीला 200 पार पोहोचवले. केकेआरकडून सौरभ दुबेने 2 बळी घेतले.
चाप मध्ये आणि पाठवले 🚀
डेव्हिड मिलर 🤝 अक्षर पटेल महत्त्वपूर्ण भागीदारीसह 🔥
अपडेट्स ▶️ https://t.co/Uo07zwiknq#TATAIPL | #खेळबिंदास | #KKRvDC pic.twitter.com/daP750wXby
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 24 मे 2026
रहाणेची एकाकी झुंज (DC vs KKR IPL 2026)
204 धावांचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात बरी झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेने 39 चेंडूंत 63 धावांची (4 चौकार, 4 षटकार) शानदार खेळी करत एका बाजूने किल्ला लढवला. फिन ॲलनने 20 आणि मनीष पांडेने 25 धावा केल्या. मात्र, रहाणे बाद होताच केकेआरची मधली फळी पत्त्यांसारखी कोलमडली. रिंकू सिंग शून्य धावांवर बाद झाला, तर कॅमेरॉन ग्रीन (2) आणि रोव्हमन पॉवेल (29) धावबाद झाल्याने कोलकात्याच्या अडचणी वाढल्या. दिल्लीकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 29 धावांत 3 बळी घेतले, तर लुंगीने 3 गडी बाद केले. मिचेल स्टार्कनेही 2 बळी घेत केकेआरचा डाव 163 धावांवर गुंडाळला.
लाँग ऑफ पासून टॉप ऑफ ऑफ 😲
समीर रिझवीच्या त्या थ्रोला मिचेल स्टार्कची मान्यता होती
अपडेट्स ▶️ https://t.co/Uo07zwiknq#TATAIPL | #खेळबिंदास | #KKRvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/wRCC0u077u
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 24 मे 2026
केकेआरसाठी बॅड लक! सुरुवात आणि शेवट पराभवाने…. (Kolkata Knight Riders IPL 2026)
कोलकाता नाइट रायडर्ससाठी आयपीएल 2026 चा हा हंगाम एका विचित्र वर्तुळासारखा राहिला. हंगामाच्या सुरुवातीला पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) केकेआरचा 6 गडी राखून पराभव केला होता. लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने त्यांना 40 धावांनी धूळ चारली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.