सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटका, हिंदुस्थानी खेळाडूने क्रिकेटच्या मैदानावरच घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदविकाराचा झटका आल्याने हिंदुस्थानी खेळाडू एस.एल. अक्षयचा मृत्यू झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अक्षय कर्नाटककडून सामने खेळले असून वेगवान गोलंदाज अशी त्याची ओळख होती. रविवारी केएससीए (KSCA) तिसऱ्या विभागाच्या सामन्यात सफायर सीसी संघाकडून खेळत होते. आपली चार षटके पूर्ण केल्यानंतर त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागले. ते तात्काळ ड्रेसिंग रूममध्ये गेले. तिथून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एस. एल. अक्षयच्या आकस्मिक निधनाच्या बातमीनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेनेही एक निवेदन जारी केले आहे. अक्षयने आपल्या खेळाच्या कारकिर्दीत प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. निवृत्तीनंतर, अक्षयने प्रशिक्षक म्हणून क्रिकेटची आवड जपली आणि कनिष्ठ स्तरावरील तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे निवेदनात म्हटले आहे.

Comments are closed.