बीड पुन्हा हादरलं! अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे संपवलं, नातेवाईक आक्रमक
बीड क्राईम न्यूज : बीड शहर पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडाने हादरले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालेपीर परिसरात अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उमेश नवनाथ दळवी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर करण्यात आलेली मारहाण ही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पद्धतीसारखीच असल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
उमेश दळवीचे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पीडित कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा कुटुंबीयांनी पोलिसांना दिला आहे. त्यामुळे उमेश दळवीचा मृतदेह सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या हत्येनंतर बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! शेतीच्या वादातून दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडले, धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलं, गुन्हा दाखल
आणखी वाचा
Comments are closed.