शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 23 कोटींचा गंडा! ‘टीडब्ल्यूजे’ कंपनीचे मुख्य संचालक ‘नार्वेकर’ दांपत्

जळगाव  : शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Jalgaon Crime News) करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर व नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला जळगाव (Jalgaon Crime News) आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. टीडब्ल्यूजे कंपनीने डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ दरम्यान जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना शेअर मार्केटबाबत खोटी माहिती दिली.(Jalgaon Crime News)

सेबीच्या नियमांचे उल्लंघन करत दरमहा मोठ्या परताव्याचे आश्वासन देत २७९ गुंतवणूकदारांकडून तब्बल २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांची गुंतवणूक जमा करण्यात आली. मात्र मुदत संपूनही गुंतवणूकदारांना पैसे परत न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी भरत रतीलाल पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी जळगाव येथील फ्रँचायझी चालक व मॅनेजर मिलिंद पाटील यालाही अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.(Jalgaon Crime News)

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. परंतू, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करून समीर सुभाष नार्वेकर (वय ३५) आणि नेहा समीर नार्वेकर (वय ३६) यांना अटक केली आहे.

Crime News नेमकं प्रकरण काय?

शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. या कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत टीडब्ल्यूजे कंपनीकडून जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या सेमिनारमधून गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. सेबीच्या नियमांना बगल देत दरमहा आकर्षक परतावा मिळण्याची हमी देऊन तब्बल २७९ गुंतवणूकदारांकडून सुमारे २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र ठरलेली मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना रक्कम परत न मिळाल्याने हा गैरव्यवहार उघडकीस आला.

या प्रकरणी भरत रतीलाल पवार यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणातील जळगाव येथील फ्रँचायझी चालक आणि व्यवस्थापक मिलिंद पाटील यालाही अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणातील व्यवहार आणि इतर संबंधितांची भूमिका तपासली जात आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.