जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त

पुणे : सध्या शाळांना (School) उन्हाळ्याची सुट्टी लागली असतानाही शिक्षकांची (Teacher) शाळा सुरुच असल्याचं दिसून येत आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना जणगनणेचं काम कराव लागत असल्याने भरउन्हात दारोदारी भटंकती होत आहे. त्यातच, कामाच्या तणावाने काही शिक्षकांमध्ये नाराजीचा सूरही पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात जनगणना कामी असलेल्या तीन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली होता. आता, आणखी एका शिक्षिकेचा अपघाती (Accident) मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. मावळ तालुक्यात जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली आहे. या घटनेनंतर शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा जनगणना कामी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

दीपाली तांबे असे मृत शिक्षिकेचे नाव असून जुना पुणेमुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलावले जात असल्यावरुन संताप व्यक्त होत आहे. शिक्षकांना सुट्टीच्या दिवशीही जनगणना कामासाठी बोलवण्यावरुन प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, शिक्षिका दीपाली तांबे यांच्या “अपघाती मृत्यूला जबाबदार कोण?” असा सवाल शिक्षकांकडून केला जात आहे. तर, महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

तीन शिक्षकांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जनगणना करताना यापूर्वी राज्यातील तीन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातील भगवान पाटील आणि सांगोला इथल्या राजाराम ढोले यांचा हृदयविकाराने, तर लातूर मधील सुंदरम वांगसकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दु:खद घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. जनगणना करणाऱ्या प्रगणकांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कुटुंबीयांस 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच कुटुंबीयांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे. या बाबतचे निवेदन खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघांचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी आजच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

हेही वाचा

मनीषा हवालदारकडून प्रश्न घेतले अन् वहीत लिहिले; 20 हजार दिल्याची चर्चा, पुण्याच्या APMA अकॅडमीच्या शिक्षकाला अटक, सीबीआयकडून लॅपटॉप, मोबाईल जप्त

आणखी वाचा

Comments are closed.