पालघरमध्ये आठ हजार सातशे बेशिस्त वाहनचालकांच्या पावत्या फाडल्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बेशिस्त वाहन चालकांविरोधात पालघरमध्ये वाहतूक शाखेने नाकाबंदी सुरू केली आहे. यामध्ये ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, परवाना नसताना वाहन चालवणे, बेदरकार स्टंटबाजी, लेन कटिंग, ओव्हरलोड वाहतूक, कर्कश हॉर्नचा वापर तसेच तर्राट होऊन गाड्या चालवणाऱ्या वाहनचाल कांच्या पावत्या फाडून १ कोटी ३२ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्या आहेत. जानेवारी ते मे अशा चार महिन्यांत आठ हजार सातशे चालकांवर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

अतिवेगाने वाहन चालविण्याच्या १९३ प्रकरणांमध्ये तब्बल ५२ लाख ६० हजार रुपयांच दंड वसूल करण्यात आला. विनाहेल्मेट वाह चालविण्याच्या १२७० जणांवर तर लेन कटिंगच्य ३४७ प्रकरणांत ५ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसू करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतुकीच्या १७६, डूं अॅण्ड ड्राइव्हच्या ९७ तर राँग साइड वाहन चालविण्याच्य ३६४ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

Comments are closed.