मुलं हिरव्या भाज्या खाण्यास कंटाळा करतात ?

जर मुलं ताटात हिरव्या भाज्या बघून पळून जात असतील किंवा खाण्यास नकार देतील असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण यात आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्ट टिप्स देणार आहेत ज्यामुळे मुलं रडारड न करता हिरव्या भाज्या आनंदाने खातील.

याबद्दल युनिसेफने एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार लहान मुलांची खाण्याची आवड आणि चव सतत बदलत असते. यामुळे मुलांचे जेवण ही पालकांसाठी अनेकवेळा डोकेदुखी ठरते. यामुळे मुलांना पौष्टीक पदार्थ खाऊ घालणे हे जगभरातील पालकांसाठी टास्क आहे. पण काही क्लृप्त्या वापरून मुलांमध्ये सकस आहाराची गोडी निर्माण करता येते.

वारंवार प्रयत्न करा
लहान मुलांना कोणताही पदार्थ एकदा खाल्यानंतर आवडत नाही. तर तो तुम्ही त्याला १० वेळा कमी प्रमाणात चवीसाठी दिलास तरच त्याच्या जिभेला त्याची चव लागते. पण तरीही जर मूल ते खाण्यास कंटाळा करत असेल तर त्याला आवडणाऱ्या पदार्थात टाकून तो पदार्थ खाण्यास द्यावा.

वेगवेगळे पदार्थ
मुलांना दररोज विविध रंगाची फळं, भाज्या. धान्य, डाळी आणि दुधाचे पदार्थ, गोड पदार्थ, सुका मेवा खाण्यास द्यावे. वेगळेपणा मुलांना आकर्षित करतो.

मुलांना बाजारात न्या
मुलांना बाजारात घेऊन जावे. फळ- भाज्या कशा निवडाव्यात ते मुलं पाहतात. भाज्या नावाने ओळखू लागतात. भाजी बघितल्यावर त्याची चवही त्यांना आठवते. त्यामुळे त्यांना आवडीच्या भाज्या ओळखता येतात.

भुक लागल्यावरच खाण्यास द्या

मुलांना कधीही खाण्यासाठी जबरदस्ती करू नये. जर मुलं कमी खात असेल. पण तब्येतीने काटक असेल वजनही ठिकठाक असेल तर चिंता करु नका. मुलांना भूक काय आहे ते कळू द्या. तसेच पोट केव्हा भरते ते समजू द्या.

कमी जेवण द्या
मुलांची भूक कमीच असते. त्यामुळे त्यांच्या मूड आणि भुकेप्रमाणे त्यांना थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खाण्यास द्यावे. थोड जरी खाल्ले तरी त्यांचे कौतुक करावे.

Comments are closed.