‘तो’ पुन्हा येतोय! IPLनंतर पहिल्यांदाच वैभव सूर्यवंशीच्या हातात बॅट; Jiohotstar नाही, तर ‘या’ च

वैभव सूर्यवंशी भारत अ वि श्रीलंका अ लाइव्ह स्ट्रीमिंग : आयपीएल 2026 मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) आता पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. ऑरेंज कॅप जिंकून चर्चेत आलेला हा 15 वर्षीय क्रिकेटपटू श्रीलंकेत होणाऱ्या तिंरगा मालिकेत (Tri-Series) इंडिया ‘अ’ संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दंबुलामध्ये रंगणार तिंरगा मालिका (IND A vs SL A Tri Series LIVE Update)

श्रीलंकेतील दंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे भारत ‘अ’, श्रीलंका ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ या तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मालिकेची सुरुवात 9 जूनपासून होणार असून अंतिम सामना 21 जून रोजी खेळला जाईल. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार असून, संघातील सर्वाधिक चर्चेचा विषय वैभव सूर्यवंशी आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने केलेल्या धडाकेबाज कामगिरीनंतर आता त्याच्याकडून पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

सामना कुठे आणि कधी पाहता येणार? (India A vs Sri Lanka A Live Streaming Update)

भारतातील क्रिकेट चाहते ही मालिका टीव्हीवर आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमांतून पाहू शकतात. थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टारवर नाही तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. तसेच लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइट केल्या जाईल. पहिला सामना भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’ यांच्यात सकाळी 10.00 वाजता (भारतीय वेळेनुसार) खेळला जाईल. यजमान श्रीलंका ‘ए’ संघाला घरच्या मैदानाचा फायदा मिळणार आहे. संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश असून निरोशन डिकवेला,  अविष्का फर्नांडो आणि सदीरा समरविक्रमा यांसारखे खेळाडू संघाला बळकटी देणार आहेत.

टीम इंडिया ‘अ’चे संपूर्ण वेळापत्रक (India A Schedule Update)

9 जून – भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
11 जून – भारत ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’
15 जून – भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
17 जून – भारत ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’
21 जून – अंतिम सामना

वैभव सूर्यवंशीकडे का लागल्या आहेत नजरा? (Vaibhav Sooryavanshi In Action India A)

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या निर्भीड फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. कमी वयात मोठ्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्याने क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे आता इंडिया ‘अ’च्या जर्सीत तो कशी कामगिरी करतो, याकडे निवडकर्ते, तज्ज्ञ आणि चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. ही मालिका वैभवसाठी केवळ आणखी एक स्पर्धा नसून, भविष्यातील भारतीय वरिष्ठ संघाच्या दारात पोहोचण्यासाठी महत्त्वाची संधी मानली जात आहे. त्यामुळे दंबुलामधील प्रत्येक डाव त्याच्यासाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

टीम इंडिया अ संघ

तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान.

हे ही वाचा –

Ind vs Afg ODI Update : कसोटी मालिका संपली, आता अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका रंगणार; रोहित मैदानात दिसणार, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण Schedule

Comments are closed.