भारताने वाढविला अण्वस्त्राचा साठा – TMarathiNews

पाकिस्तान संबंधीही झाला खुलासा : सिप्रीच्या अहवालातून माहिती उघड :

  • जागतिक स्तरावर वाढणारा भूराजकीय तणाव आणि महासत्तांदरम्यान अविश्वासाच्या वातावरणादरम्यान अण्वस्त्रांवरून अत्यंत चकित करणारा अहवाल समोर आला आहे. संरक्षण क्षेत्रावर नजर ठेवणारी प्रतिष्ठित जागतिक संस्था ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूट“ने (सिप्री) स्वत:चे वार्षिक ‘सिप्री ईयरबुक 2026“ जारी केले आहे. अण्वस्त्रांची संख्या आणि त्याच्या प्रभावाला कमी करण्यासाठी दशकांपासून हो त असलेले आंतरराष्ट्रीय प्रयत्न आता पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार भारताने  स्वत:च्या अण्वस्त्र साठ्यात लक्षणीय वाढ केली आहे.

वृत्तसंस्था, स्टॉकहोम

जगातील अनेक देश स्वत:च्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी पुन्हा एकदा अण्वस्त्रांवरील निर्भरात वाढवत आहेत. अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करत असल्याने जागतिक स्तरावर अणुयुद्ध किंवा गैरसमजामुळे होणाऱ्या आण्विक तणावाचा धोका अत्यंत अधिक वाढला आहे.अहवालानुसार दक्षिण आशियात रणनीतिक संतुलनाच्या दृष्टीकोनातून भारताने नवा पल्ला गाठला आहे. भारताचा अण्वस्त्रांचा साठा 2025 च्या 180 वॉरहेड्सवरून वाढत 2026 मध्ये 190 वॉरहेड्सपर्यंत पोहोचला आहे. याच वाढीसह भारत रणनीतिक स्वरुपात स्वत:चा शेजारी देश पाकिस्तानच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानची अण्वस्त्रक्षमता या कालावधीत कुठल्याही बदलाशिवाय 170 वॉरहेड्सवर थांबली आहे. भारत वेगाने आणि अधिक परिपक्ततेसह स्वत:च्या रणनीतिक क्षमतांचा विस्तार करत असल्याचे या अहवालातून निदर्शनास `येते.

भारताची झेप, पाकिस्तानची स्थिरता

भारत आणि पाकिस्तान दोघेही स्वत:चे आण्विक बळ अन् क्षेपणास्त्र डिलिव्हरी सिस्टीमला सातत्याने आधुनिक करत आहेत. परंतु संख्याबळाप्रकरणी भारताने आता स्पष्टपणे आघाडी घेतली आहे. भारताकडे आता 190 अण्वस्त्रs आहेत, तर पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रं आहेत. भारताने आता कुठल्याही अनपेक्षित संकटाच्या स्थितीत अत्यंत कमी कालावधीत प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यासाठी स्वत:ला सज्ज केले आहे. भारत आता शांतताकाळातही स्वत:च्या क्षेपणास्त्रांवर कमी संख्येत आण्विक वॉरहेड तैनात करू शकतो. ही क्षमता भारताच्या मोहिमात्मक सज्जतेत आलेल्या मोठ्या बदलाला दर्शविणारी आहे.

किरकोळ घट, आधुनिकीकरणाचे वादळ

जानेवारी 2026 पर्यंत जगाचा एकूण आण्विक भांडार 12,187 वॉरहेड्सचा होता. तर मागील वर्षी ही संख्या 12,241 इतकी होती. अनेक देश स्वत:च्या कालबाह्या अन् सेवामुक्त अण्वस्त्रांना नष्ट करण्याची प्रक्रिया मंद करत आहेत. नव्या अधिक घातक आण्विक प्रणालींची तैनात वेगाने करत आहेत, यामुळे आगामी काळात हा ट्रेंड पूर्णपणे पलटू शकतो आणि एकूण संख्या पुन्हा वाढू शकते. जगभरात एकूण 12,187 अण्वस्त्रांपैकी जवळपास 9,745 वॉरहेड्सना सैन्य भांडारात संभाव्य वापरासाठी पूर्णपणे तयार ठेवण्यात आले आहे. यातील जवळपास 4012 वॉरहेड्सना क्षेपणास्त्रs अन् लढाऊ विमानांवर सक्रीय स्वरुपात तैनात करण्यात आले आहे. जगभरात सुमारे 2,100 ते 2,200 आण्विक वॉरहेड्सना ‘हाय ऑपरेशन अलर्ट“वर ठेवण्यात आले आहे. म्हणजेच ही अशी अण्वस्त्रs आहेत जी केवळ काही मिनिटांच्या आदेशावर डागली जाऊ शकतात. या श्रेणीत सर्वाधिक अण्वस्त्रs रशिया आणि अमेरिकेकडे आहेत.

देशनिहाय अण्वस्त्रांचे बळ

अण्वस्त्रांच्या शर्यतीत आजही शीतयुद्धाच्या कालखंडातील मुख्य प्रतिस्पर्धी रशिया आणि अमेरिकाच सर्वात आघाडीवर आहेत. जागतिक स्तरावर या दोन्ही देशांचाच दबदबा आहे.

?रशिया : रशिया सध्या जगातील सर्वात मोठा आण्विक शक्ती संपन्न देश असून त्याच्याकडे एकूण 5,420 वॉरहेड्सचा विशाल भांडार आहे.

?अमेरिका : अमेरिका या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्याच्याकडे वर्तमानात 5,042 वॉरहेड्स अस्तित्वात आहेत.

?चीन : चीनही स्वत:च्या आण्विक ताफ्याला अत्यंत आक्रमकपणे वाढवत आहे. चीनचा आण्विक भांडार 600 वरून वाढत 620 वॉरहेड्स झाला आहे.dर

?फ्रान्स : फ्रान्सने स्वत:च्या भांडारात सर्वाधिक वेगाने वाढ करत याला 290 वरून थेट 370 वॉरहेड्सपर्यंत पोहोचविले आहे.

?ब्रिटन : ब्रिटनने स्वत:च्या रणनीतिक क्षमतेला स्थिर ठेवले आहे, ब्रिटनकडे सध्या 225 वॉरहेड्स आहेत.

?इस्रायल : मध्यपूर्वेत जारी युद्ध आणि तणानंतरही इस्रायलचा अनुमानित अण्वस्त्र भांडार कुठल्याही बदलाशिवाय 90 वॉरहेड्सवर कायम आहे.

?उत्तर कोरिया : उत्तर कोरिया देखील सातत्याने घातक अण्वस्त्रs तयार करत आहे. त्याचा भांडार 50 वरून वाढत 60 वर पोहोचला आहे.

 

 

Comments are closed.