मध्यपूर्वेतील शांततेचा परिणाम की वादळापूर्वीची शांतता? सोने-चांदीचे दर घसरले; आजचा भाव किती? ही

सोन्याचांदीचे आजचे दर: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने चांदीच्या (Gold Silver Rates) किमतींवर प्रचंड दबाव आहे. इराण, इस्रायल अमेरिकेच्या तणावाचा फटका  जगभरातील गुंतवणूकदारांना बसतोय. भूराजकीय परिस्थिती, बदलती राजकीय गणिते आणि इराण अमेरिकेच्या संघर्षाचा एकत्रित परिणाम सध्या सोने चांदीवर होतोय. देशांतर्गत बाजारात चांदी आठवड्याभरात जवळपास 20,450 रुपयांनी घसरलीय. आज किलोमागे चांदीचा दर  246,710 रुपये प्रति किलोवर आली. तर  सोने मागील आठवड्याच्या तुलनेत 4390 रुपयांनी घसरून 154,810 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे, सोमवारीही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली होती. चांदीच्या किमती जवळपास 7 टक्क्यांनी कोसळल्या होत्या, तर सोन्याच्या दरात 2 टक्क्यांहून अधिक घट झाली होती. त्यामुळे मध्यपूर्वेतील शांततेचा हा परिणाम आहे की वादळापूर्वीची शांतता याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Gold Silver Rates:सोने चांदीचा आजचा दर किती?

बुलीयन्स असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार, 10 gm सोन्यासाठी ग्राहकांना 1 लाख 54 हजार 810 रुपये मोजावे लागतील. हे दर  GST शिवाय आहेत, शहरानुसार यात बदल होतात. तर चांदीचा आजचा दर 246,710 प्रति किलो झाला आहे.

Gold Silver Drop Reasons:सोने चांदीच्या दरात चढउतार होण्याची करणे काय?

1. तज्ञांच्या माहितीनुसार, इराण-इस्रायल संघर्षविराम किती काळ टिकेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

2.दरम्यान, सोमवारी इराण आणि इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनानंतर संघर्षविरामाची घोषणा केली. मात्र, इराणने इशारा देताना म्हटले आहे की, लेबनॉनमधील हिझबुल्लाहच्या ठिकाणांवर इस्रायलने हल्ले सुरू ठेवल्यास ते पुन्हा लष्करी कारवाई करू शकतात. त्यामुळे

3.भूराजकीय तणाव कमी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीवरील मागणी कमी झाली असून, त्यामुळे दोन्ही धातूंच्या किमतींवर दबाव कायम आहे. बाजारातील गुंतवणूकदार आता मध्यपूर्वेतील घडामोडींसह महागाई आणि व्याजदरांबाबतच्या संकेतांवर लक्ष ठेवून आहेत.

4.याशिवाय, या आठवड्यात जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या महत्त्वाच्या महागाईच्या आकडेवारीकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे. या आकडेवारीतून अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजेच Federal Reserve व्याजदरांबाबत पुढे कोणती भूमिका घेऊ शकते, याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉच भूमिका घेत आहेत.

5. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात देशातील नागरिकांनी वर्षभरात सोने खरेदी करु नये असं आवाहन केलं होतं. यानंतर सराफा व्यावसायिकांकडून देशवासियांना जुनं सोनं जमा करुन नवं सोनं खरेदी करावं म्हटलं होतं. त्यामुळे ग्राहकांनी जुने सोने मोडण्यास सुरुवात केल्यानं बाजारातील सोने वाढले आहे. याशिवाय भारतानं सोने आयातीवरील शुल्क वाढवल्याचा देखील परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला. याच कारणांमुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम असून, सोने-चांदीच्या दरांमध्येही सावध व्यवहार पाहायला मिळत आहेत

Comments are closed.