ऋतुराजला तोड नाही भाऊ… निवड समितीने डावललं, ऐनवेळी एन्ट्री मारली अन् पहिल्याच सामन्यात शतक! स

रुतुराज गायकवाडचे शतक भारत अ विरुद्ध श्रीलंका अ सामना : श्रीलंका ‘अ’ विरुद्धच्या तिंरगा मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारत ‘अ’ संघाचा उपकर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने शतक ठोकले. विशेष म्हणजे, संघाची घोषणा झाली तेव्हा गायकवाडचा संघात समावेश नव्हता. मात्र, रियान पराग (Riyan Parag) दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनं करत निवडकर्त्यांना आपल्या बॅटनेच उत्तर दिलं.

सुरुवातीलाच भारताला बसले धक्के (India A vs Sri Lanka A Tri-Series)

भारत ‘अ’ची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) अवघ्या 2 धावांवर बाद झाला, तर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) 14 धावांवर माघारी परतला. त्यामुळे संघ अडचणीत सापडला होता. यानंतर प्रियांश आर्य आणि ऋतुराज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. प्रियांशने 32 धावांची खेळी केली, मात्र तो धावबाद झाला.

रुतुराज ट्रबल-शूटर ठरला (रुतुराज गायकवाड शतक 114 चेंडूत 101 धावा)

अशा कठीण परिस्थितीत ऋतुराज गायकवाडने जबाबदारी स्वीकारली. त्याने 114 चेंडूंमध्ये 101 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. हे शतक त्याच्या लिस्ट-ए कारकिर्दीतील 21वे शतक ठरले. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो देशांतर्गत आणि ‘अ’ स्तरावरील क्रिकेटमध्ये आपली छाप कायम ठेवत आहे. ऋतुराला कर्णधार तिलक वर्माची उत्तम साथ लाभली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी रचत श्रीलंकेच्या गोलंदाजांना विकेटसाठी झगडायला लावले.

तिलक वर्मानेही संयमी आणि जबाबदार फलंदाजी करत 97 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. अखेर मोहम्मद शिराज याने तिलकला बाद केले, तर शतकवीर ऋतुराजला वनुजा सहानने झेलबाद केले.

संधी मिळताच सोनं केलं

संघात सुरुवातीला स्थान न मिळाल्याने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र दुखापतीमुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत ऋतुराजने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. त्यामुळे निवडकर्त्यांसाठीही हा स्पष्ट संदेश ठरला आहे की, मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची त्याची क्षमता अजूनही तितकीच मजबूत आहे.

हे ही वाचा –

IND A vs SL A ODI : अजब-गजब रनआऊट… श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज आणि प्रियांश खेळपट्टीच्या एकाच टोकावर; पुढे काय घडलं?, VIDEO

Comments are closed.