आमदारांना काही त्रास असेल तर दूर करु, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी : एनडीएचा चेहरा मोदीजी आहे. त्यांचा कोण आहे, इंडीया आघाडमध्ये जे जातात ते पराभूत होतात, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. आता जागा खाली आहे का? रिक्त आहे का? मी मुख्यमंत्री असताना आम्ही टीम म्हणून काम करत होतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. आमचं बॉन्डिंग कायम आहे आणि राहणार आहे असे ते म्हणाले. आमची लढाई खुर्चीचा नाही, महाराष्ट्राचे कल्याण करण्याचा आमचा अजेंडा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महायुती आमदारांचा काही त्रास असेल तर दूर करु आणि सोडवू असेही ते म्हणाले. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे बच्चू कडू म्हणाले होते.
नेमकं काय म्हणाले होते बच्चू कडू?
देवाभाऊंचं (देवेंद्र फडणवीसांचं) प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे (मराठी) मुख्यमंत्री व्हावे. 15 ते 20 दिवसांत आम्ही विदर्भात अनेक ठिकाणी पक्षासाठी दौरे केले, लोकांशी बोललो. चार दिवसांत मी विदर्भामध्ये 20 सभा केलेल्या आहे. मला खात्री आहे की हाच विदर्भ एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेल, असं विधान शिवसेनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं होतं. तसेच शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही. शांत, सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू…स्वबळावर की नाही, ते ठरले नाही. मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचंच आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील एक नंबरची लोकप्रियता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. इतिहासातील सर्वाधिक कालावधी ते पंतप्रधान राहिलेत. यशस्वी कारकिर्द त्यांनी गाजवली आहे. 12 वर्षात एकही सुट्टी न घेतेलेले असे पंतप्रधान ते आहेत. त्यांना जगातील एक नंबरची लोकप्रियता असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 2014 नंतर देशाला प्रगतीपथावर आणि विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम मोदीजींनी केले.
भारत पुढे गेला तर त्यांचा पराभव होईल
अर्थव्यवस्था मजबूत केली आणि 11 व्या क्रमांकावरुन 4 थ्या क्रमांकावर आलो. तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प त्यांनी केला असल्याचे शिंदे म्हणाले. 2047 विकसित भारताचा संकल्प केला आहे. 2014 पूर्वीची परिस्थिती पाहिली तर अनेक घोटाळे पाहिलेत. मोदीजींच्या 12 वर्षात एकही दाग लावण्याची हिंमत केली नाही. बेदाग असे ते पंतप्रधान राहिले आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. कोणीतरी ऑनलाईन आलेत. टीएमसी, उबाठा, काँग्रेस हारलेत, जे इंडिया आघाडीत गेलेत ते पराभूत झालेत. तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो अशी इंडिया आघाडीची परिस्थिती आहे. सोबत येत एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात असे शिंदे म्हणाले.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.