वैभवच्या क्रेझमुळे सामना लाइव्ह
हिंदुस्थान अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्या त्रिकोणी एकदिवसीय मालिकेपूर्वीच वैभव सूर्यवंशी चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीला या मालिकेचे थेट प्रक्षेपण ठरले नव्हते. मात्र वैभवचे नाव संघात जाहीर होताच प्रसारणकर्त्यांनी निर्णय बदलला आणि सामने थेट दाखवण्याची तयारी केली. दांबुलामध्ये सुरू होणाऱ्या मालिकेत सर्वांच्या नजरा या 15 वर्षीय फलंदाजीच्या चमत्काराकडे लागल्या आहेत. मैदानात उतरण्यापूर्वीच वैभवने लोकप्रियतेचा चौकार ठोकला आहे.
Comments are closed.